शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने रॅलीद्वार केला मोदींना पुन्हा विजयी करण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 11:17 IST

येत्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करण्यासाठी भाजपतर्फे रविवारी शहरातून ‘विजय संकल्प दुचाकी रॅली’ काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या विजयासह ‘भारतमाता की जय...,’ ‘वंदे मातरम्...’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्रातील  सर्व विधानसभा मतदारसंघांत एकाच वेळी ही रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देभाजपने रॅलीद्वार केला मोदींना पुन्हा विजयी करण्याचा संकल्प रॅलीपुढे मोदी यांची प्रतिमा असलेला चित्ररथ

कोल्हापूर : येत्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करण्यासाठी भाजपतर्फे रविवारी शहरातून ‘विजय संकल्प दुचाकी रॅली’ काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या विजयासह ‘भारतमाता की जय...,’ ‘वंदे मातरम्...’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्रातील  सर्व विधानसभा मतदारसंघांत एकाच वेळी ही रॅली काढण्यात आली.सकाळी साडेअकरा वाजता गांधी मैदान येथून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व भाजप महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली दुचाकी रॅलीला सुरुवात झाली. पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा असलेला चित्ररथ रॅलीच्या पुढे होता.

खरी कॉर्नर, पापाची तिकटी, गंगावेश, पंचगंगा नदी, तोरस्कर चौक, दसरा चौक, लक्ष्मीपुरी, गोखले कॉलेज, राजारामपुरी, बागल चौक, सासने मैदान, शासकीय विश्रामगृह, लाईन बझार, कसबा बावडा, एस. पी. आॅफिस, महापालिका चौक, शिवाजी चौक या मार्गावरून फिरून पुन्हा गांधी मैदान येथे रॅलीची सांगता झाली.संदीप देसाई म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या घोषणेप्रमाणे भाजपच्या प्रत्येक बूथप्रमुख व बूथसदस्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना घराघरांत जाऊन सांगाव्यात.महेश जाधव म्हणाले, पुलवामा हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली म्हणून हल्ल्यानंतरच्या १३ व्या दिवशीच दुसरा सर्जिकल स्ट्राईक घडवून भारताने ३५० च्या वर दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले. हे पंतप्रधान मोदी यांच्यामुळेच शक्य झाले. त्यामुळे पुन्हा अशाच कणखर नेत्याला निवडून दिले पाहिजे.रॅलीत दिलीप मेत्राणी, संतोष भिवटे, हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, मारुती भागोजी, सुरेश जरग, श्रीकांत घुंटे, आर. डी. पाटील, नगरसेवक अजित ठाणेकर, किरण नकाते यांच्यासह नचिकेत भुर्के, अ‍ॅड. संपतराव पवार, अप्पा लाड, विजय अगरवाल, नजीर देसाई, संजय सावंत, आशिष कपडेकर, चंद्रकांत घाटगे, दिग्विजय कालेकर, डॉ. सदानंद राजवर्धन, भारती जोशी, सुलभा मुजुमदार, किशोरी स्वामी, गायत्री राऊत, प्रदीप पंडे, संतोष माळी, सतीश घरपणकर, विवेक कुलकर्णी, हेमंत कांदेकर, गणेश खाडे, मुसाभाई कुलकर्णी, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूर