शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

कागलच्या राजकारणात ट्विस्ट! समरजित घाटगे गेले कुणीकडे, भूमिकेविषयी जिल्ह्यात उत्सुकता

By समीर देशपांडे | Updated: July 4, 2023 12:45 IST

सोशल पोस्टपासून बातम्याबाबतही जागरूक असलेले घाटगे या घडामोडींबद्दल काहीच बोलत नसल्याने तर्कवितर्क

समीर देशपांडेकोल्हापूर : भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि कागल मतदारसंघातील उमेदवारीचे भक्कम दावेदार समरजित घाटगे नेमके गेले कुणीकडे, असा सवाल विचारला जात आहे. कारण हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांचा ठावाठिकाणाच कोणी अधिकृत सांगत नसून ते फोनही घेत नाहीत. व्हॉट्सॲपवरील मेसेजलाही ते उत्तर देत नाहीत. चंदगडच्या उमेदवारीचे दावेदार भाजपचे शिवाजी पाटील हे अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेले आहेत.गेल्या विधानसभेला अपक्ष समरजित घाटगे यांनी कडवी टक्कर देत मुश्रीफ यांना जेरीस आणले होते. पराभव झाल्यानंतर मात्र त्यांनी दुसऱ्या दिवसापासून पायाला भिंगरी लावली. मतदारसंघातील अनेक गावे त्यांनी चार वर्षांत पालथी घातली. मतदारसंघातील प्रत्येक प्रश्न मांडत राहिले, मुश्रीफ महाविकास आघाडीत मंत्री असतानाही त्यांना घाटगे यांनी अंगावर घेतले.संपर्क, जोडीला गेल्या वर्षभरात आणलेला निधी, सोशल मीडिया, छोट्या छाेट्या जोडण्या या सगळ्यांमध्ये घाटगे कोठेही कमी पडत नव्हते. परंतु, दिल्लीच्या पातळीवरचा निर्णय रविवारी मुंबईत अंमलात आला आणि मुश्रीफच आता कॅबिनेट मंत्रिपद घेऊन करवीर नगरीत येणार आहेत. समरजित यांच्यासाठी हा फार मोठा धक्का आहे. रविवारी ते कोल्हापूरमध्येच असल्याचे सांगण्यात येते. कारण निपाणीचे जोल्ले दाम्पत्याने रविवारी घरी भेट दिल्याचे फोटो त्यांनीच फेसबुकवरून शेअर केले आहेत. परंतु, या मोठ्या उलथापालथीनंतर समरजित यांचा माध्यमांशी संपर्कच झालेला नाही. सोशल पोस्टपासून बातम्याबाबतही जागरूक असलेले घाटगे या घडामोडींबद्दल काहीच बोलत नसल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. ते भाजपचा राजीनामा देणार अशीही चर्चा सोशल मीडियावर कालपासून चर्चेत आहे.

समरजित यांच्यासमोरील पर्याय

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून भावी उज्ज्वल भवितव्य आहे असा आशावाद ठेवून भाजपमध्येच राहणे.
  • वेळ पडल्यास पक्षाच्या विरोधात बंड
  • घाटगे हे लगेचच पक्षाविरोधात भूमिका घेणार नाहीत असे दिसते. पक्षाच्या विरोधात गेल्यानंतर मंडलिक आणि मुश्रीफ एकत्र राहिले तर त्यातून घाटगे यांना कोणताच फायदा नाही. त्यामुळे ‘थांबा व पाहा’ अशीच त्यांची सध्याची भूमिका.

शिवाजीरावांचे पक्षकार्य राहणार सुरूचशिवाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अक्कलकोटला आल्याचे सांगितले. ते म्हणाले, काहीही बदल घडले असले तरी माझ्या पक्षाचे काम तालुक्यात करू नको असे मला कोणीच म्हणणार नाही. त्यामुळे मी चंदगड तालुक्यात पक्षकार्य करतच राहणार.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणkagal-acकागलSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे