शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

भाजपकडून शेतकऱ्यांची फसवणूक : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:26 IST

गडहिंग्लज : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचा शेतकºयांकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे. त्यामुळे देशात कृषी व बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने तुटपुंजी कर्जमाफी आणि रोजगार निर्मिती करून शेतकरी आणि बेरोजगारांची फसवणूक केली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केला.ऐनापूर (ता. गडहिंंग्लज) ...

गडहिंग्लज : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचा शेतकºयांकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे. त्यामुळे देशात कृषी व बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने तुटपुंजी कर्जमाफी आणि रोजगार निर्मिती करून शेतकरी आणि बेरोजगारांची फसवणूक केली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केला.ऐनापूर (ता. गडहिंंग्लज) येथे शेतकरी मेळावा आणि सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा काँगे्रसचे अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील होते. यावेळी यशवंत सरपंच पुरस्कार प्राप्त सरपंच दिग्विजय कुराडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांचा सत्कार झाला.चव्हाण म्हणाले, काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने एकरकमी ७२ हजार कोटींची कर्जमाफी देऊन दुष्काळग्रस्त शेतकºयांना दिलासा दिला होता. मात्र, ३४ हजार कोटींची कर्जे माफ केल्याचे सांगणाºया भाजप सरकारकडून शेतकºयांना अद्याप १० ते १२ कोटीही मिळालेले नाहीत. वर्षाला दोन कोटी नवीन नोकºया निर्माण करण्याची घोषणा केलेल्या सरकारने १० लाख नोकºयादेखील निर्माण केलेल्या नाहीत. त्यामुळे खोटी आश्वासने दिलेल्या सरकारला शेतकरी व युवकच खाली खेचतील.आमदार पाटील म्हणाले, यशवंत ग्रामपंचायतीचा पुरस्कार मिळविलेल्या ऐनापूर ग्रामपंचायतीचे काम अन्य गावांनाही प्रेरणादायी असून, गावच्या विकासासाठी १० लाखांचा निधी देत आहे.सरपंच कुराडे यांनी स्वागत केले. काँगे्रसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. सुरेश कुराडे यांनी प्रास्ताविक केले. तानाजी चौगुले व सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्यास काँगे्रसचे तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील, किसनराव कुराडे, जे. बी. बार्देस्कर, जयप्रकाश नलवडे, जयवंत शिंपी, राजेश नरसिंगराव पाटील, बसवराज आजरी, बाबासाहेब पाटील, अनिल कुराडे, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची संख्या लक्षणीय होती.