शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
2
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
3
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
4
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
5
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
6
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
7
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
8
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
9
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
10
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
11
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
12
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
13
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
14
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
15
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
16
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
17
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
18
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
19
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

कोल्हापूरसाठी बरेच काही करता आले असते; पण लक्षात राहील असे कोणतेही काम झाले नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 12:22 PM

अंबाबाई मंदिर विकास आराखडाही गेल्या पाच वर्षांत रखडला. २५५ कोटींचा हा आराखडा वर्षभरापूर्वी ८० कोटींपर्यंत खाली आणला आणि त्यातील केवळ सात कोटी रुपये महापालिकेला दिले. मनात आणले असते तर या आराखड्यातील अनेक कामे पूर्ण करता आली असती.

ठळक मुद्देभाजप सरकारला तसेच तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना शहरासाठी बरेच काही करता आले असते; पण लक्षात राहील असे कोणतेही काम झाले नाही.

कोल्हापूर : राज्यात तसेच केंद्रात भाजपचे सरकार आणि कोल्हापूर महानगरपालिकेत कॉँग्रेस-राष्टÑवादीची सत्ता अशी विचित्र परिस्थिती गेल्या पाच वर्षांत निर्माण झाल्यामुळे कोल्हापूर शहराचा विकास म्हणावा तितक्या गतीने झाला नाही. उलट कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील अनेक प्रकल्पही पूर्णत्वास गेले नाहीत. सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता राज्यात सत्तांतर झाल्यामुळे आणि कॉँग्रेस-राष्टÑवादी या सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे महापालिकेचे भाग्य उजळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांना मोठी खाती मिळाली. त्यांना सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले. सन २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी महानगरपालिकेची निवडणूक झाली. महापालिकेवर भाजपचा झेंडा लावायचा, असा निर्धार पाटील यांनी केला. त्यांनी त्याकरिता महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीशी युती केली; परंतु भाजप व ताराराणी आघाडी यांना ३३ जागा मिळाल्या. महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न थोडक्यात भंगले. त्याचे शल्य पाटील यांच्या मनात सतत पाच वर्षे बोचत राहिले.

राज्यात आणि महापालिकेतील सत्तेत एकमेकांच्या विरोधातील मंडळी बसल्याने महापालिकेचे गेल्या पाच वर्षांत मोठे नुकसान झाले. महापालिकेला गेल्या अनेक वर्षांपासून दोन उपायुक्त, दोन साहाय्यक आयुक्त, आरोग्याधिकारी, जल अभियंता, कार्यकारी अभियंता अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. या पदांचे अधिकारी राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर दिले जातात. सातत्याने मागणी करूनही हे अधिकारी आजअखेर मिळालेले नाहीत. कोणी पाठपुरावा करायला गेलेच तर त्यांना ‘तेवढं सोडून बोला’ असे वरिष्ठ अधिकारी खासगीत सांगत होते. वरिष्ठ अधिकारी, राज्यकर्त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे महापालिकेचा कारभार खिळखिळा झाला.

कॉँग्रेस आघाडी सरकारने कोल्हापूरसाठी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना मंजूर केली. योजनेच्या कामाला सुरुवात झाली आणि भाजप सरकार सत्तेवर आले. या योजनेच्या पूर्ततेकरिता केंद्र व राज्य सरकारने निधी दिला असल्यामुळे सरकारच्या नियंत्रणाखालीच ही योजना पूर्ण करणे आवश्यक होते; पण तसे घडले नाही. योजनेवर काम करण्याकरिता पाच ते सहा अभियंता मिळावेत, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती; पण या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. अधिकारी दिले नसल्यामुळे आजही एकच शाखा अभियंता या योजनेचे काम पाहत आहेत.

राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचे काम महापालिकेने हाती घेतले असून, पहिल्या टप्प्यातील सर्व कामे स्वनिधीतून केली. दुसºया टप्प्यासाठीच्या निधीसाठी तत्कालीन महापौर हसिना फ रास, सरिता मोरे यांनी सरकारकडे मागितला. निवेदने दिली, तत्कालीन पालकमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितली; पण कसलेच सहकार्य मिळाले नाही.

अंबाबाई मंदिर विकास आराखडाही गेल्या पाच वर्षांत रखडला. २५५ कोटींचा हा आराखडा वर्षभरापूर्वी ८० कोटींपर्यंत खाली आणला आणि त्यातील केवळ सात कोटी रुपये महापालिकेला दिले. मनात आणले असते तर या आराखड्यातील अनेक कामे पूर्ण करता आली असती. शहरातील खराब रस्ते करण्याकरिता १७८ कोटींच्या मागणीचा प्रस्ताव, सेफ सिटी दुसरा टप्पा, केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदान सुशोभीकरण, आदी प्रस्ताव प्रलंबित राहिले. भाजप सरकारला तसेच तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना शहरासाठी बरेच काही करता आले असते; पण लक्षात राहील असे कोणतेही काम झाले नाही.फक्त टोल घालवला...भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी कोल्हापुरातील टोल घालविण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला जागत सरकारने टोल घालवला हे खरे असले तरी कोल्हापूर शहराचे सगळे प्रश्न सुटले असे नाही. शहरातील रस्ते महापुरात वाहून गेले असताना त्यासाठी विशेष बाब म्हणून निधी दिला असता तरीही जनतेने कौतुक केले असते. जलवाहिनी टाकणे (११४ कोटी) तसेच ड्रेनेज लाईन टाकणे (७० कोटी) या कामांसाठी राज्य सरकारने निधी दिला खरा; पण ही कामेही अर्धवट आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलMuncipal Corporationनगर पालिकाBJPभाजपा