शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

कोल्हापुरातील यमगे येथील मेंढपाळाच्या पोराचे UPSC परीक्षेत लख्ख यश!, बिरदेव डोणे याने मिळवली ५५१ वी रँक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 19:00 IST

आयपीएस झाला तरी बिरदेव आई-वडीलांसोबत बकरी चारण्यात व्यस्त

अनिल पाटीलमुरगूड: वडील मेंढपाळ, घरात कसलीही सुविधा नाही, शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक. पहिल्यापासूनच अधिकारी होणाचे स्वप्न होते अन् अखेर बिरदेव सिध्दाप्पा डोणे (रा. यमगे ता. कागल. जि. कोल्हापूर) या मेंढपाळाच्या मुलाने ते पुर्ण केले. बिरदेव यांनी संघर्षातून घेतलेली ही झेप समाजापुढे प्रेरणादायी ठरणार आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात बिरदेव याने देशात ५५१ वी रँक मिळवली आहे. निकाल समोर आला त्यावेळी बिरदेव आपल्या आई वडील यांच्यासह बेळगाव परिसरात बकरी चारण्यामध्ये व्यस्त होता. आज तो यमगे मध्ये येणार आहे.घर जागा नसल्याने शाळेचा व्हरांडा करायचा अभ्यासबिरदेवचं बालपण डोंगरदर्‍यांमध्ये मेंढ्या चारत, कधी उघड्यावर अभ्यास करत तर कधी पोटासाठी झगडत गेले. काही तरी मोठं करायचं, स्वतःच्या आयुष्याला दिशा द्यायची आणि गावकऱ्यांचा अभिमान वाटावा असं काहीतरी घडवायचं असे स्वप्न त्याने उराशी बाळगले. गावातील शाळेत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दोन खोलीचं घर अभ्यास करायला जागा नसल्याने गावातील मराठी शाळेचा व्हरांडा तो अभ्यासामध्ये व्यस्त असायचा. दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून तो मुरगूड केंद्रात पहिला आला होता. यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारात त्याने आय.पी.एस होण्याचे स्वप्न व्यक्त केले होते. बारावी विज्ञान शाखेत ही चमकदार कामगिरी करत ८९ टक्के गुण मिळवत मुरगूड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला होता. त्यानंतर त्याने पुणे सी.ओ.इ .पी येथे स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केले. स्पर्धा परीक्षेचे वेड, तिसऱ्या प्रयत्नात मिळवले यशसुरवाती पासून स्पर्धा परीक्षेचे वेड असल्याने त्याने सुरवातीस दोन वर्षे दिल्ली मध्ये जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC ) परीक्षेची तयारी करू लागला त्यानंतर तो परत पुणे येथे आला तिथे सदाशिव पेठे मध्ये अभ्यास करू लागला.त्याने आता पर्यंत दोन वेळा ही परीक्षा दिली होती पण त्याला यशाने हुलकावणी दिली होती. पण जिद्दीने त्याने मागील वर्षी पुन्हा परीक्षा दिली आणि यामध्ये उज्वल यश मिळवत त्याने देशात ५५१ वी रँक मिळवली. कागल तालुक्यातील पहिला आय.पी.एस अधिकारीबिरदेव आपल्या आई वडीलासह बुधवारी गावी परतणार आहे. यावेळी त्याचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन ग्रामस्थ करत आहेत. कागल तालुक्यातील पहिला आय पी एस अधिकारी होण्याचा बहुमान बिरदेव ने मिळवला आहे. सोशल मीडियावर कागलचा अभिमान बिरदेव अशा पोस्ट व्हायरल होत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरupscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाkagal-acकागल