शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बिरोबाच्या नावाने चांगभलंच्या गजरात वाशी बिरदेव जळयात्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 12:16 IST

Religious programme Washi Kolhapur- "सुंबरान मांडलं, धनगरानं माडलं,बिरोबाच्या नावाने चांगभलंच्या गजरात खारीक, खोबरं भंडाऱ्याच्या उधळणीत ढोलाच्या, कैताडच्या निनादात, भाविकाविना  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गोवा या राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वाशी ता. करवीर येथील बिरदेवाची त्रैवार्षिक जळयात्रेतील मुख्य दिवस पार पडला. आज, बुधवारी यात्रेचा शेवटचा दिवस आहे. 

ठळक मुद्देशासकीय नियमाचे पालन वाशी येथील बिरदेव जळयात्रा 

सडोली (खालसा)/कोल्हापूर : "सुंबरान मांडलं, धनगरानं माडलं,बिरोबाच्या नावाने चांगभलंच्या गजरात खारीक, खोबरं भंडाऱ्याच्या उधळणीत ढोलाच्या, कैताडच्या निनादात, भाविकाविना  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गोवा या राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वाशी ता. करवीर येथील बिरदेवाची त्रैवार्षिक जळयात्रेतील मुख्य दिवस पार पडला. आज, बुधवारी यात्रेचा शेवटचा दिवस आहे. बिरोबा देवाचा यात्रेतील दुसऱ्या दिवशी (दुसरी पालखी) पहाटे आरती करण्यात आली. बिरोबाच्या नावाने चांगभलं घ्याच्या गजरात डोक्यावर आंबिलचे कलश घेऊन गावातील सुहासिनीनी वडी भाकरी, पुरणपोळीचे नैवेद्य अर्पण केले. कांडगाव (ता. करवीर) येथील मगदुम नरके-नाईक घराण्याला गाडा (बैलजोडी) आणण्याचा मान आहे. दुपारी १४ बैल जोडुन सजवलेल्या सात बैलगाड्या आणण्यात आल्या. मानाच्या गाड्यांचे स्वागत रानगे पुजारी यांनी केले. परंतु कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर केवळ दहा मानकऱ्याना प्रवेश देण्यात आला. यावेळी भिमराव मगदुम, संभाजी पाटील(पाटील), नारायण  नाईक (कोतवाल) या मानकऱ्यासह सविता मगदूम यांना सुवासिनीचा मान देण्यात आला. 

साडेचार वाजता पालखीभेट सोहळा पार पडला. संध्याकाळी हेडाम, भाकणूक, छबिना मिरवणूक देव जळ खडकास जळास जाणे व वांझ मेंढीचे दुध काढणे, मानाचे बकरे मांडीवर घेऊन तलवारीने तोडणे व दाताने बकरे तोडण्याचे धार्मिक कार्यक्रम कार्यक्रम पोलीस बंदोबस्तात व मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. आज, बुधवारी यात्रेचा शेवटचा दिवस आहे. यादिवशी ग्रामस्थ व भाविक सुमारे दहा ते पंधरा हजार बकऱ्याचा बळी चढवतात परंतु शासनाने यात्रेवर निर्बंध आणल्याने बकऱ्याना जीवदान मिळाले आहे.

 यावेळी बबन रानगे, के.डी.सी.बँकेच्या संचालिका उदयानी देवी साळुंखे, हर्षवर्धन साळुंखे, सरपंच गिता लोहार, उपसरपंच  संगिता पाटील, अरूण मोरे, संदीप पाटील, इंद्रजित पाटील, ग्रामसेविका टी.जी अत्तार, ग्रामसेवक एकनाथ शिंदे, बिरदेवालयाचे अध्यक्ष रघुनाथ पुजारी, रंगराव पुजारी, कृष्णात पुजारी, लक्ष्मण पुजारी यांच्यासह ट्रस्टचे सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. करवीरचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली तीन दिवस कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

यात्रा रद्द झाल्यामुळे कोट्यावधीचे नुकसान 

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर वाशी येथील जळयात्रा रद्द झाल्याने खेळणी, मिठाई, पाळणे, नारळ व इतर दुकानदाराचे व व्यापाऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. 

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या