शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

पक्षिनिरिक्षणात रंकाळ्यावर आढळले २३ प्रजातींचे पक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 18:05 IST

bird watching kolhapur- रंकाळा तलावावर विविध स्थानिक आणि स्थलांतरीत पक्ष्यांची रेलचेल आहे. विशेषत: पाणपक्षी, विविध जातीचे बगळे, वंचक, ग्रे हेरॉनसारख्या कधीही पहायला न मिळणारे २३ प्रजातींचे पक्षी पाहण्याचा आनंद चिल्लर पार्टीच्या ज्युनियर सदस्यांनी रविवारी घेतला.

ठळक मुद्देपक्षिनिरिक्षणात रंकाळ्यावर आढळले २३ प्रजातींचे पक्षीरहिवाशी, स्थलांतरीत पक्ष्यांचा समावेश : चिल्लर पार्टीच्या सदस्यांचे पक्षिनिरिक्षण

कोल्हापूर : रंकाळा तलावावर विविध स्थानिक आणि स्थलांतरीत पक्ष्यांची रेलचेल आहे. विशेषत: पाणपक्षी, विविध जातीचे बगळे, वंचक, ग्रे हेरॉनसारख्या कधीही पहायला न मिळणारे २३ प्रजातींचे पक्षी पाहण्याचा आनंद चिल्लर पार्टीच्या ज्युनियर सदस्यांनी रविवारी घेतला.चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या ज्युनियर सदस्यांसाठी हे पक्षिनिरिक्षण आयोजित करण्यात आले होते. कळंबा तलावावरील पक्षिनिरिक्षणानंतर रंकाळा तलावावरील या पक्षिनिरिक्षणात विविध प्रजातींच्या पक्षी मुलांना पहायला मिळाले.

चिल्लर पार्टीचे मिलिंद यादव यांनी या पक्ष्यांची प्रत्यक्ष ओळख करुन दिली. पक्षी कसे ओळखावेत, त्यांच्या सवयी कशा असतात, त्यांचे खाद्य काय, रहिवाशी पक्षी कोणते, स्थलांतरीत पक्षी कोणते, अशा प्रकारची सूक्ष्म माहिती यादव यांनी या मुलांना करुन दिली. सकाळी ७ वाजता संध्यामठ परिसरातून हे पक्षिनिरिक्षण सुरु करण्यात आले. रंकाळ्याच्या काठाकाठाने फिरुन दोन तासानंतर क्रशर चौकात या उपक्रमाचा समारोप करण्यात आला.मुलांनी आपल्याकडील दुर्बिणीतून हे विविध प्रजातीचे पक्षी पाहिले. याशिवाय मोबाईलवरुन तसेच कॅमेऱ्यातून या पक्ष्यांची छायाचित्रेही काढली.या पक्षिनिरिक्षणात चिल्लर पार्टीचे आर्षद आणि ईशान महालकरी, श्रीनाथ काजवे, मनस्वी आणि यशोवर्धन आडनाईक, चंद्रकांत तुदिगाल, घनश्याम लाड, ओंकार कांबळे, अनुजा बकरे आदी ज्युनियर सदस्य सहभागी झाले होते. या उपक्रमाचे आयोजन शिवप्रभा लाड, मिलिंद कोपार्डेकर, सलीम महालकरी यांनी केले.रंकाळ्यावर आढळले हे पक्षी :नाम्या, जांभळी पाणकोंबडी, जकाना किंवा कमळपक्षी, स्मॉल ब्ल्यू किंगफिशर, व्हाईट थ्रोटेड किंगफिशर, कवड्या धीवर, टिबुकली, लहान बगळा, वंचक, राखी बगळा, पाणकावळा, तुतारी, पिवळा धोबी, स्पॉट बिल्ड डक, सुरई (रिव्हरटर्न), शेकाट्या, तारवाली, टिटवी, वेडा राघू, रेड व्हेन्टेड बुलबुल, ब्राम्हणी घार, ब्लॅक हेडेड आयबीस 

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यkolhapurकोल्हापूर