शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

‘अमर रहे’ घोषणांनी बिंदू चौक दुमदुमला

By admin | Published: December 25, 2014 11:43 PM

जीवनमुक्ती संस्थेचा उपक्रम : ज्योत प्रज्वलित करून शहिदांना श्रद्धांजली

कोल्हापूर : येथील जीवनमुक्ती सेवा संस्थेच्यावतीने आज, गुरुवारी सायंकाळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी श्रद्धादीप प्रज्वलित करण्यात आला. भारतमाता की जय, वंदे मातरम् , शहीद जवान अमर रहे... अशा घोषणांनी बिंदू चौक परिसर दुमदुमून केला. शहीद दिनानिमित्त शहरातून शहीद ज्योतीची मिरवणूकही काढण्यात आली. जीवनमुक्ती सेवा संस्थेच्यावतीने २५ डिसेंबर हा दिवस प्रत्येक वर्षी ‘शहीद अभिजित सूर्यवंशी शहीद दिन’ म्हणून पाळण्यात येतो. आजही यानिमित्ताने श्रद्धादीप प्रज्वलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते शहीद ज्योत प्रज्वलित करून नंतर मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिकामार्गे बिंदू चौक अशी ज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. ही ज्योत बिंदू चौकात येताच भारतमाता की जय, वंदे मातरम्, शहीद जवान अमर रहे... अशा घोषणा देण्यात आल्या. अ‍ॅड. धनंजय पठाडे, डॉ. संदीप पाटील, नगरसेवक आदिल फरास, महापालिकेचे मुख्य लेखापाल संजय सरनाईक, पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, उदय दुधाणे, सागर बगाडे, आदी मान्यवरांच्या हस्ते श्रद्धाज्योत प्रज्वलित करण्यात आली. याचवेळी व्हाईट आर्मीचे जवान, अवनी, बालकल्याण संकुल, चेतना मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांनी बिंदू चौक परिसरात पणत्या लावून शहीद जवानांना आदरांजली वाहिली. नगरसेवक आदिल फरास, पोलीस निरीक्षक मोहिते, प्रतिभा करमरकर यांची भाषणे झाली. या सर्वांनी जीवनमुक्ती संस्थेचा तसेच व्हाईट आर्मीचा कार्यविस्तार आणखी व्हावा, अशी अपेक्षा केली. तसेच सुरू असलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. संस्थेचे प्रमुख अशोक रोकडे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन सार्थक क्रिएशनचे सागर बगाडे यांनी केले. (प्रतिनिधी)