शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! बाळूमामा देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 00:02 IST

शिवराज नायकवडी यांच्यासह त्रिसदस्यीय समितीची प्रशासकपदी नेमणूक,देवस्थानचा कारभार स्वीकारला.

शिवाजी सावंत 

गागोटी:गेले अनेक महिने झाले बाळूमामा देवस्थान मंदिराच्या विश्वस्त मंडळ यांच्या मनमानी भ्रष्टाचारी कारभार विरुध्द भक्तांनी धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागितली होती.त्याचा आज सोमवारी (दिं.२४)रोजी निकाल होऊन विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले.धर्मादाय सहआयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी हा निकाल दिला.तर प्रशासकपदी शिवराज नायकवडी यांनी निवड झाली आहे. त्रिसदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे.प्रशासक म्हणून अधीक्षक शिवराज नाईकवाडे,निरीक्षक एम .के.नाईक व निरीक्षक श्रीनिवास शेनॉय यांची नेमणूक केली आहे.

     अधिक माहिती अशी की आदमापुर ता.भुदरगड येथील संत बाळूमामा मंदिरात विश्वस्त मंडळांतील काही कारभाऱ्यांनी मनमानी कारभार करून कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार केला असल्याची खात्री आणि पुराव्यातून प्रवीण पाटील बिद्री (ता.कागल)रवींद्र नारायण पाटील फये (ता. भुदरगड),हणमंत दत्तात्रय पाटील आकुर्डे (ता.भुदरगड) यांनी याचिका दाखल केली.त्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे ९ऑगस्ट २०२१ रोजी या विरोधात याचिका दाखल केली.या याचिकेत विश्वस्त मंडळावर पुराव्यानिशी आरोप करण्यात आले होते.याचिकाकर्त्यानी ' बाळूमामा मंदिरात जमा होणारे दान हे गोरगरीब जनतेचे आणि कष्टकरी भक्तांचे आहे.या दान रक्कमेवर तत्कालीन कार्याध्यक्ष मगदूम यांनी योग्य विनियोग केला नसल्याचा आरोप होता.

  न्यायालयाने सर्व पुरावे तपासून विश्वस्त मंडळ बरखास्त केले तर पोलिस पाटील आणि सरपंच या पदसिध्द विश्वस्तांना दोषमुक्त केले.शिवराज नायकवडी यांची प्रशासक तर आणखी दोन सदस्य अशी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली.त्यांनी सोमवारी रात्री देवस्थान मंदिराच्या कारभाराचा ताबा घेतला आहे. 

ठळक आरोप     एकाच जमिनीची दोन महिन्यात दोन वेळा खरेदी,७६ लाख रूपयांची पहिली खरेदी तर दोन महिन्यांनी तीच जमीन आठ कोटी रुपयांना,जमिनीचे मूळ मालक दिनकर सत्तू कांबळे हे असताना महाराष्ट्र इंजिनियरिंग वर्कच्या नावे पैसे आरटीजीएस,पाण्याचे एटीएम बसविण्यासाठी शोभा संदीप मगदूम यांना सहा लाख रुपयेचे मशीन बसविण्याचा ठेका ,यात जमा होणाऱ्या रक्कमेतून सत्तर टक्के मगदूम यांना पैसे ,    बग्यात जमा होणाऱ्या दान रक्कम दोन तीन दिवसांनी जमा, दुकानाचा करार दोन वर्षे अकरा महिने असताना जवळच्या लोकांचे पाच पाच वर्षांचे करार     मंदिरातील दान पेटीत जमा होणारे दान काढताना अथवा मोजताना व्हिडिओ शूटिंग नाही.जमा झालेली रक्कम चार दिवसांनी जमा केली जाते.      

टॅग्स :Balumamachya Navane Changbhaleबाळूमामाच्या नावानं चांगभलं