शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक उपक्रमांनी बिग बीचा वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 15:55 IST

amitabhbacchan, birthday, kolhapurnews करोडो प्रेक्षकांचे आवडते अभिनेता अमिताभ बच्चन अर्थात बिग बी यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देसामाजिक उपक्रमांनी बिग बीचा वाढदिवस अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

कोल्हापूर : करोडो प्रेक्षकांचे आवडते अभिनेता अमिताभ बच्चन अर्थात बिग बी यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दिवसभर शहरातील बच्चनप्रेमींनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला.उजळाईवाडी येथील चित्रकार शकील नदाफ यांनी पोर्ट्रेटच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांची प्रतिमा गहू, तांदूळ, उडीदडाळ यांच्या साहाय्याने साकारली. हे पाहण्यासाठी दिवसभर बच्चनप्रेमींनी गर्दी केली होती.यावेळी अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाइड यांच्या वतीने अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त आदिल फरास यांच्या पुढाकारातून अंबाबाई मंदिराच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.बच्चन साहेब फॅन्स ग्रुपच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बच्चन यांना उदंड आयुष्य लाभावे अशी प्रार्थना केली. दोन वर्षांसाठी पाच गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च, दोन गरीब कुटुंबांना एक वर्षासाठी दरमहा ६०० रुपये देण्याचा निश्चय केला. सायंकाळी बच्चन यांच्या चित्रपटातील गाण्यांवर कराओके ट्रॅकवर गाणी गाईली गेली. तसेच केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला.कोरोना योद्ध्यांचा सत्कारअमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाइड, कोल्हापूर व एबीइएफ टीम यांच्या वतीने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मृतदेहांवर जातपात न पाहता अंत्यसंस्कार करणारी कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल समिती तसेच लॉकडाऊनच्या दरम्यान भटक्या जनावरांना व निराधार लोकांना खाऊ घालणाऱ्या कोल्हापूर वुई केअर या संस्थांचा यानिमित्ताने सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाइडचे सदस्य किरण शहा यांनी एन ९५ मास्कचे वाटप केले. तसेच ग्रुप मेंबर सरिता राजेभोसले यांच्या वतीने दोन्ही सामाजिक संस्थांना मानचिन्हे देण्यात आली. यावेळी ग्रुपचे प्रमुख अ‍ॅड. इंद्रजित चव्हाण, सूर्यकांत पाटील बुधिहाळकर, बैतुलमाल समितीचे जाफरबाबा, नगरसेवक तौफिक मुलाणी तसेच कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड उपस्थित होते.

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनkolhapurकोल्हापूर