शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

साडेसात हजार मुलींना सायकलचा आधार

By admin | Updated: July 6, 2015 00:27 IST

पावणेतीन कोटी खर्च : पाचवी ते बारावीपर्यंत मुली

कोपार्डे : घरापासून शाळेपर्यंतचे अंतर ३ ते ५ कि.मी. असणाऱ्या व पाचवी ते बारावीपर्यंतच्या मागासवर्गीय व अल्प उत्पन्न असणाऱ्या मुलींसाठी शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी जिल्हा परिषदेने शासकीय सायकल योजनेतून जिल्ह्यातील सात हजार ५६९ मुलींना सायकलींचे वितरण केले आहे. यात महिला व बालकल्याण विभागाकडून दोन हजार ६५७, तर समाज कल्याण विभागाकडून चार हजार ९१३ सायकलींचे वाटप केले आहे.ग्रामीण भागातील मुलींना एस.टी. बससाठी मोफत पास सेवेबरोबर कायमस्वरूपी प्रवासातील अडचणींवर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन आघाडी शासनाने ही सायकल योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविली. मागासवर्गीय मुलींना समाजकल्याण विभागामार्फत, तर ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न २१ हजारांपेक्षा कमी आहे, अशा मुलींना महिला व बालकल्याण विभागामार्फत सायकल योजनेतून सायकल वाटप करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेने ही योजना राबविण्यासाठी दोन कोटी ७७ लाख रुपयांची तरतूद केली होती. यातून महिला व बालकल्याण विभागाकडून ९८ लाख ९७ हजार १२० रुपये खर्चून दोन हजार ६५७ सायकली वाटप करण्यात आल्या. २०१४-१५ साठी हा निधी खर्च केला आहे. त्याशिवाय २०१३-१४ मध्ये करवीर व कोल्हापूर ग्रामीणमधील सायकल प्रस्ताव मंजूर होते, पण वाटप झाले नव्हते अशा १२८ सायकलीही २०१४-१५ मध्ये वाटप करण्यात आल्या आहेत.समाज कल्याण विभागाकडून मागासवर्गीय मुलींना सायकल योजनेतून २०१४-१५ साठी सायकल वाटपसाठी एक कोटी ७४ लाख ६७ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. पैकी एक कोटी ७४ लाख ६५ हजार ७१५ रुपये निधी खर्च करून चार हजार ९१३ सायकली खरेदी करून त्यांचे वाटप करण्यात आले आहे. सायकलींची निविदा मागवून की लिलाव पद्धतीने खरेदी करावयाच्या यातून मोठा वादंग निर्माण झाला होता. मात्र, लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी प्रशासकीय व लोकप्रतिनिधींनी आपला हेका सोडल्याने जिल्ह्यातील साडेसात हजार मुलींना शाळेला पोहोचण्यासाठी सायकलचा आधार मिळाला आहे. (वार्ताहर)तालुकावार सायकल वितरणाची २०१४-१५ ची आकडेवारीतालुक्याचेमहिला व बालसमाजकल्याण नावकल्याण विभागविभागकरवीर६०३१०३०कागल१९४२६५पन्हाळा१८५१३२राधानगरी२४११३५शाहूवाडी१८५१००शिरोळ१५३७२०हातकणंगले१९८१५२३गगनबावडा६४२००गडहिंग्लज१६८११०चंदगड२८५१४०भुदरगड२०२१४५आजरा७९४१०एकूण२६५७४९१३2,657जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून 4,913समाजकल्याण विभागाकडून सायकलींचे शालेय मुलींना वाटप