शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

भुदरगड तालुक्यात गौण खनिजांची लूट !

By admin | Updated: March 31, 2015 00:27 IST

कारवाई तीव्र होणार : भरारी पथकांना पोलीस संरक्षण देण्याची गरज

शिवाजी सावंत - गारगोटी  भुदरगड तालुक्यात अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन आणि वाहतूक यांचा माफियांनी सपाटा लावला होता. तहसील विभाग दंडात्मक कारवाई करते आणि माफिया पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ करीत व्यवसाय सुरू ठेवतात. याला ‘लोकमत’ने सर्वप्रथम वाचा फोडली. त्यामुळे प्रथमच महसूल विभागास जाग आली. त्यामुळे तब्बल सात लाख ९३ हजार १२५ रुपये दंड वसूल करण्यात आला.माती, दगड आणि वाळू या गौण खनिजांच्या अवैधरित्या अनेक खाणी चालू आहेत. पारगाव येथून बॉक्साईट, तर संपूर्ण तालुक्यातून दगड, करडवाडीपासून वाघापूरपर्यंत वेदगंगा नदीपात्रातील वाळू उपसा सुरू आहे. या सर्व अवैध धंद्यांची माहिती शासकीय कर्मचाऱ्यांना नाही म्हणणे आळसाचे होईल. कारण हे सर्व धंदे दिवसाढवळ्या करून याची वाहतूक ट्रॅक्टर, ट्रकमधून केली जाते. दिवसेंदिवस माफिया हे नीडर होत असल्याने केवळ दंडात्मक कारवाई न करता फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. कारण दंडात्मक कारवाईस ते घाबरत नाहीत. जर हे उत्खनन असेच होत राहिले, तर पर्यावरणाचा ऱ्हास तर होईलच, शिवाय भावी पिढी केवळ खाणीचे खड्डे पाहून जगणार काय? ती कशावर जगू शकेल? याचा विचार होणे आवश्यक आहे. जगातील अनेक देश आपल्या खाणी बंद करून बाहेरून बॉक्साईट जमा करीत आहेत. कारण भविष्यात हे साठे संपतील, तेव्हा केवळ त्यांच्याकडेच खाणी असतील. त्यावेळी आपल्या देशाची स्थिती ‘आपलं दिलं फुकून आणि दुसऱ्याचे ठेवले राखून’ अशी होईल व देश परावलंबी होईल. दररोज लाखो टन वैध आणि अवैधरित्या गौण खनिज परदेशात जात आहे. या नैसर्गिक साधन संपत्तीची पुनर्निर्मिती करता येत नसल्याने हे साठे पुरवून वापरणे गरजेचे आहे.तालुक्यात नदीचा उगम झाल्याने नदीचे पात्र तुलनेने अरुंद आहे. अशा पात्रातील वाळू उपसा असाच होत राहिल्यास मातीची धूप होईल, शिवाय नदीकाठच्या जमिनी तुटत राहतील. नदीपात्रातील खड्ड्यांनी अनेकांचे जीव घेतले आहेत. या नदीतील वाळू उपसा करणे योग्य आहे का? याचे संशोधन होणे आवश्यक आहे. तहसील विभागातील भरारी पथक फिरत असते. मात्र, कारवाई करताना त्यांच्या जीवितास धोका आहे. तेव्हा त्यांना पोलीस संरक्षण देणे गरजेचे आहे.सर्व खाणी मोजल्यास कोट्यवधी रुपये दंड शासनास मिळू शकतो. १४/१५ या वर्षांत अकरा लाख नव्वद हजार ७३९ रुपये रॉयल्टी जमा झाली आहे, तर दंड सात लाख ९३ हजार १२५ रुपये असे एकूण १९ लाख ९३ हजार ८६४ रुपये महसूल जमा झाला आहे. या अवैध वाहतुकीविरोधी कारवाईचे तालुक्यातून कौतुक होत आहे. भविष्यात सर्व सुजाण व जागरुक नागरिकांनी तहसील विभागास माहिती देऊन सहकार्य केल्यास कारवाई आणखी तीव्र करता येईल, असे महसूल विभागाचे नायब तहसीलदार व्ही. एन. बुट्टे व भरारी पथकातील तलाठी डी. डी. झंजे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.