शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

भोई, मुस्लिम मतदानाचे पॉकेट ठरणार ‘निर्णायक’

By admin | Updated: October 20, 2015 00:18 IST

अटीतटीची लढत : दोन माजी नगरसेवकांच्या पत्नींसह सहाजण रिंगणात--शिपुगडे तालीम

कोल्हापूर : ‘शिपुगडे तालीम’ हा नवीन, पुनर्रचनेत तयार झालेला प्रभाग आहे. आजपर्यंत या प्रभागातून मतदारांनी दर पाच वर्षांनी नवख्या उमेदवारालाच संधी दिली आहे. या प्रभागात सध्या स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे यांच्या पत्नी, माजी नगरसेवक धनंजय सावंत यांच्या पत्नी, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या पत्नी व काँग्रेसच्या विद्या घोरपडे व पद्मावती विजय घाटगे, अपक्ष लता वसंत शिंदे नशीब अजमावत आहे.या प्रभागातून अमृता सावंत यावेळेला शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेऊन मतदारांसमोर जात आहेत, तर नंदकुमार मोरे यांचे निवासस्थान असलेला, हक्काचे मतदान असलेला व त्यांना पूरक असलेला असा हा मतदारसंघ आहे. गतवेळेला भोई आणि मुस्लिम समाजाने राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश गवंडी यांना भरघोस मते दिली. त्यांचा विजय सुकर झाला. गवंडी हे या वेळेला राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवार सरिता मोरे यांच्या पाठीशी राहणार, हे स्पष्ट आहे. त्याचबरोबर नंदकुमार मोरे यांचा घर ते घर संपर्क, सातत्याने सक्रिय जनसंपर्क असल्यानेही त्यांची ही जमेची बाजू आहे. मोरे यांना मानणारे गोपनीय मतदान आहे. त्याचबरोबर भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार पवित्रा देसाई यांचे पती संदीप हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आहेत. २०१० ला ते जनसुराज्य-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार होते. त्यामुळे त्यांचाही या प्रभागात जनसंपर्क आहे. गेली पाच वर्षे ते नागरिकांच्या अडीअडचणी सोडवीत आहेत. केएमटीचे माजी जनसंपर्क अधिकारी प्रताप घोरपडे यांच्या पत्नी विद्या या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. विद्या घोरपडे या महिला शहर उपाध्यक्षा आहेत. त्यांनी शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून दिला आहे. त्यांचाही घर ते घर प्रचार सुरू असून, चौथी फेरी सुरू आहे. याचबरोबर पद्मावती विजय घाटगे व लता वसंत शिंदे या अपक्ष उमेदवारही आपले नशीब अजमावत आहेत. ( प्रतिनिधी )फराकटेंचा थांबण्याचा निर्णयगेल्यावेळी येथून निवडून आलेले माजी उपमहापौर दिगंबर फराकटे यांनी यावेळी थांबण्याचा निर्णय घेतला आहे; तर २००० मध्ये अवघ्या चार मतांनी पराभूत झालेल्या अमृता सावंत शिवसेनेच्या उमेदवार आहेत. गेली १५ वर्षे त्यांचे पती धनंजय सामाजिक कार्यात आहेत. तेही २००५ ला निवडून आले होते. पण, त्यांचा जातीचा दाखला अपात्र ठरविल्याने त्यांची कारकीर्द अवघ्या १७ महिन्यांची राहिली. त्यानंतरही ते विविध प्रश्नांत अग्रेसर आहेत.या प्रभागात भोई, मुस्लिम, परीट, जैन समाजाचे मतदार आहेत. त्यात विशेषत: भोई, मुस्लिम यांची मतदारसंख्या जास्त आहे. या दोन्ही समाजांची मतेच या वेळेला निर्णायक ठरणार आहेत. नव्याने तयार झालेल्या या मतदारसंघात मराठा समाजासह भोई, परीट, मुस्लिम यांची मतदारसंख्या जास्त आहे.