शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

भोगावती परिसर, हुपरीत चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:07 IST

‘भोगावती’मधून अडीच लाखांचा ऐवज लंपासलोकमत न्यूज नेटवर्कभोगावती : भोगावती, कौलव येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी विविध दूध संस्था आणि दुकानांना लक्ष्य करीत तब्बल अडीच लाखांवर ऐवज लंपास केला. भोगावती (ता. करवीर) येथील लुक्स गारमेंट या दुकानातील रोकडसह एक लाखाचा ऐवज लंपास केला. अभिषेक इलेक्ट्रॉनिकमधील सतरा हजार $रुपयांसह तीन एलईडी असा दीड ...

‘भोगावती’मधून अडीच लाखांचा ऐवज लंपासलोकमत न्यूज नेटवर्कभोगावती : भोगावती, कौलव येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी विविध दूध संस्था आणि दुकानांना लक्ष्य करीत तब्बल अडीच लाखांवर ऐवज लंपास केला. भोगावती (ता. करवीर) येथील लुक्स गारमेंट या दुकानातील रोकडसह एक लाखाचा ऐवज लंपास केला. अभिषेक इलेक्ट्रॉनिकमधील सतरा हजार $रुपयांसह तीन एलईडी असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी अन्य दोन दुकान फोडली. मात्र, काही मिळाले नाही, तर कौलव (ता. राधानगरी) येथे विठ्ठाई दूध संस्था, पिठाची चक्की व भोगावती येथील अजित चरापले यांच्या टायरचे दुकान, शिवशक्ती वॉच कंपनी ही दुकाने फोडली.हळदी, वाशीत चोºयासडोली (खालसा) : वाशी व हळदी (ता. करवीर) येथील बेकरीमालाचे व होलसेल किराणा माल दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी बिस्कीट बॉक्स व इतर २७ हजारांच्या मालासह सुमारे वीस हजार रुपये लंपास केले. ही चोरी शनिवारी रात्री झाली असून, याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.अधिक माहिती अशी की, वाशी (ता. करवीर) येथील खंडेराव दिनकर कांबळे यांचे नंदवाळ फाटा येथे बेकरीमालाचे दुकान असून, शनिवारी भाऊबीज असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू होते. विक्री झालेले पाच हजार ड्रॉव्हरमध्ये ठेऊन त्यांनी रात्री दुकान बंद केले. रविवारी सकाळी एका कामगाराला दुकानाचे दार उचकटल्याचे लक्षात आले. त्याने लगेच कांबळे यांना घरी जाऊन हा प्रकार सांगितला. पाहणी करताना हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्याने या बेकरीमाल दुकानामधील महागडे बिस्कीट पुडे, आइस्क्रीम असा सात हजार रुपयांचा माल व पाच हजार रुपये लंपास केले.हळदी येथील राजू बाबूराव तेली यांच्या होलसेल किराणा मालाच्या दुकानाचे शटर उचकटून व कुलूप तोडून चोरट्याने काजू बिया, बदाम, वेलदोडे, बेदाणे असा वीस हजार रुपयांच्या मालासह दहा हजार रुपयांची रोकड लंपास केली. या दोन्हीही चोरीची नोंद करवीर पोलिसांत झाली असून, अधिक तपास करवीर पोलीस करीत आहेत.आणाजे, सिरसे येथे दूध संस्था फोडल्याआमजाई व्हरवडे : आणाजे, सिरसे (ता. राधानगरी) परिसरात चोरट्यांनी शनिवारी रात्री येथील दोन दूध संस्था व सिरसे येथील दूध संस्थेत डल्ला मारला. चोरट्यांनी रोख २५ हजार रुपये लंपास केले.आणाजे येथील इवराई सहकारी दूध संस्थेत चोरट्यांनी प्रवेश करून तिजोरीचे लॉक तोडून रोख २५ हजार पळविले. साहित्यांची मोडतोड करून साहित्य विस्कटले. त्यानंतर चोरट्यांनी येथील कामधेनू दूध संस्थेकडे मोर्चा वळविला. येथे तिजोरीचे लॉक तोडत असतानाच शेजारी मंदिरात झोपलेले ग्रामस्थ जागे झाले. ते बाहेर येताच चोरट्यांनी पळ काढला. सिरसे येथील मुख्य रस्त्यावर असणाºया शरदचंद्र सहकारी दूध संस्थेत तिजोरीचे लॉक तोडून चोरट्यांनी साहित्यांची मोडतोड करून साहित्य विस्कटले. या तिजोरीत काहीच मिळाले नाही. रविवारी सकाळी सात वाजता कर्मचारी दूध संकलनासाठी आले असता चोरीचा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.आकनूर परिसरात १२ संस्थांसह घर फोडलेसरवडे/ सोळांकुर : राधानगरी तालुक्यातील आकनूर, सुळंबी, मांगेवाडी या गावांत चोरट्यांनी संस्था व बंद घरांना लक्ष्य केले. मात्र, दूध संस्थांनी दिवाळीपूर्वीच बोनस व रिबेट वाटप केल्याने चोरट्यांच्या हाती मोठी रक्कम लागली नाही.आकनूरमधील घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. याची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे. चोरट्यांनी रविवारी रात्री मांगेवाडीतील रामलिंग दूध संस्था, सुळंबीतील श्रीराम दूध संस्था, आकनुरातील चाळकेश्वर दूध संस्था व हनुमान रेशनिंग दुकान, सेवा संस्थेचे गोडावून, आदी ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यानंतर मांगेवाडी रस्त्यावरील शिक्षक गणेश रंगराव चव्हाण यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून ५० ते ६० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. आरोग्य विभागाचे कर्मचारी अनिता पाटील-माने व विक्रम पेडणेकर यांच्या घरी चोरीच प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिसरात भीती पसरली आहे.पाच महिन्यांपूर्वीच्या चोºयांचा तपास नाहीचया परिसरात गेल्या पाच पाच महिन्यांपूर्वी चोरट्यांनी असाच धुमाकूळ घालत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. त्यावेळीही चोरट्यांनी दुकान, दूध संस्थांनाच लक्ष्य केले होते. हे चोरटे अद्यापही पोलिसांच्या हाताला लागले नाही. तोपर भाऊबीज संपताच चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर या परिसरात पोलिसांनी रात्री गस्त सुरू करावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.