शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: भोगावती कारखाना निवडणूक: मतदान चुकीचे नोंदवल्यावरुन मतमोजणीवेळी गोंधळ

By राजाराम लोंढे | Updated: November 20, 2023 11:54 IST

मतमोजणी थांबवण्याची विरोधकांची मागणी 

कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील भाेगावती सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी सोमवारी सकाळी आठ पासून रमणमळा, कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात सुरु झाली. राधानगरी तालुक्यातील तरसंबळे येथील केंद्रावर मोजणी सुरु असताना विरोधी परिवर्तन आघाडीच्या उमेदवाराला पडलेले मत मोजणी कर्मचाऱ्यांनी सत्तारुढ आघाडीचे उदयसिंह पाटील-कौलवकर यांच्या नावावर नोंदवल्याने गोंधळ उडाला. यावेळी मतमोजणी थांबवण्याची मागणी विरोधी आघाडी घेत मोजणी कर्मचारी म्हणून विकास संस्थांचे सचिव नको, असा आग्रह धरला आहे.‘भोगावती’साठी काल, रविवारी चुरशीने ८६.३३ टक्के मतदान झाले होते. तिरंगी लढत असली तरी निवडणूकीत विरोधकांनी चांगलीच हवा निर्माण केल्याने मोजणी प्रक्रियेकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सकाळी आठ वाजता मोजणीस सुरुवात झाली. एकूण ३६ टेबलांवर मतदान केंद्र १ ते ३६ ची मोजणी सुरु करण्यात आली. साधारणता अकरा वाजता तरसंबळे येथील केंद्रावरील मोजणीवेळी विरोधी आघाडीच्या एका उमेदवाराचे मत मोजणी कर्मचाऱ्यांने सत्तारुढ आघाडीच्या उदयसिंह पाटील-कौलवकर यांच्या नावावर नोंदवल्याचे निदर्शनास आल्याने उपस्थित मोजणी प्रतिनिधींनी हरकत घेतली.

त्यांनी मोजणी प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची मागणी करत विकास संस्थांचे सचिव मोजणी कर्मचारी नको असा आग्रह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे धरला. यामुळे मोजणी ठिकाणी काही काळ गोंधळ उडाला. मात्र, मोजणी थांबवण्याची मागणी फेटाळून लावत मोजणी प्रक्रिया सुरुच ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक