शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील टाकळीवाडीत सहकार विभागाने टाकला छापा, २१ लाखांचे बेकायदा दस्त सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 13:03 IST

मेंढपाळ व्यवसाय असल्याचे दाखवले

कोल्हापूर : टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील धनपाल निंगाप्पा भमाणे व सदाशिव धनपाल भमाणे यांच्याकडे बेकायदा सहा करारपत्रे व जमिनीचे २१ लाख किमतीचे ९ दस्त सापडले आहेत. सहकार विभागाच्या पथकाने बुधवारी छापा टाकल्यानंतर हे उघड झाले असून, त्याची खातरजमा करून आज संबंधितांवर गुन्हे दाखल होणार आहेत.धनपाल भमाणे, सदाशिव भमाणे व अजित आम्माण्णा गोरवाडे (टाकळीवाडी) हे सावकारी करत असल्याच्या तक्रारी सुशिला श्रीपाल गोरवाडे व वैशाली बाबासाहेब गोरवाडे यांनी सहकार विभागाकडे केली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथकाने सकाळी भमाणे व गोरवाडे यांच्या घरावर छापे टाकले. अजित गाेरवाडे यांचे घर बंद आढळून आले, ते दक्षिण भारत सहलीसाठी गेल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितल्याने अधिकाऱ्यांनी त्यांचे घर सील केले. धनपाल भमाणे, सदाशिव भमाणे यांच्याकडे ५० व १०० रुपयांचे स्टॅम्पपेपर वरील करारपत्रे सहा, जमीन खरेदीच्या अनुषंगाने झालेली २१ लाखांची खरेदीपत्रे नऊ व रोख रक्कम आढळून आली आहे. या सर्वांचा पंचनामा झाला असून, खातरजमा केल्यानंतर संबंधितांवर गु्न्हे दाखल होणार आहेत. पथकामध्ये आर. जी. कुलकर्णी, शैलेश शिंदे, संतोष कांबळे, जे. एन. बंडगर, व्ही. व्ही. वाघमारे, पी. व्ही. फडणीस, अजित गोसावी, पांडुरंग खोत यांचा सहभाग होता.भमाणे यांच्याकडे हे सापडले :५०,१० रुपयांच्या स्टॅम्पपेपर वरील करारपत्रे सहाखरेदीपत्रे :१ हेक्टर जमिनीचा ९ लाखांचा व्यवहार.१ हेक्टर २० गुंठे जमिनीचा ७ लाख १५ हजारांचा व्यवहार.१ हेक्टर १८ गुंठे जमिनीचा ४ लाख ५० हजारांचा व्यवहार.१ गुंठ्यातील बांधलेल्या मिळकतीचा १ लाख ३० हजारांचा व्यवहारभमाणे यांचा मेंढपाळ व्यवसायधनपाल व सदाशिव भमाणे यांचा मेंढपाळ व्यवसाय असल्याचे दाखवले आहे. त्यांनी केलेल्या करारपत्र व खरेदीपत्रातील रक्कमा पाहता, अत्यंत कमी रक्कमेत शेती खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर