शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ आता दोघांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 13:27 IST

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या वहिती खातेधारक शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांपैकी एकास आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. कृषी विभागाने त्यासंबंधीचा शासन आदेश शनिवारी काढला आहे. राज्यात सुमारे १ कोटी ५२ लाख खातेदार शेतकरी असून त्याच्या दुप्पट (३ कोटी ४ लाख) लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल. शेतकऱ्याला स्वत:शिवाय अन्य कुणाला या योजनेचा लाभ द्यायचा. त्याचे नाव योजनेसाठी (नॉमिनीप्रमाणे) अगोदर सुचवावे लागेल.

ठळक मुद्देशेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ आता दोघांनाशासनाचा निर्णय : कुटुंबातील खातेदार नसलेल्या एकास लाभ

विश्वास पाटील कोल्हापूर : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या वहिती खातेधारक शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांपैकी एकास आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. कृषी विभागाने त्यासंबंधीचा शासन आदेश शनिवारी काढला आहे.

राज्यात सुमारे १ कोटी ५२ लाख खातेदार शेतकरी असून त्याच्या दुप्पट (३ कोटी ४ लाख) लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल. शेतकऱ्याला स्वत:शिवाय अन्य कुणाला या योजनेचा लाभ द्यायचा. त्याचे नाव योजनेसाठी (नॉमिनीप्रमाणे) अगोदर सुचवावे लागेल.शेती करताना होणारे अपघात किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना कायमचे अपंगत्व येते. कर्त्या व्यक्तीस अपघात झाल्याने कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते. अशा कुटुंबांना लाभ देण्यासाठी राज्य शासनातर्फे ही मूळ योजना २००४ पासून राबविण्यात येत अहे.

योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यास २ लाख रकमेचे विमा संरक्षण दिले जाते; परंतु आतापर्यंत एकट्या शेतकऱ्यालाच या योजनेचा लाभ मिळत होता. त्यामुळे योजनेचा लाभ कुटुंबियांनाही मिळावा, अशी मागणी खूप दिवसांपासून सुरू होती.कशासाठी मिळणार विमा संरक्षणवीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात.कुणाला मिळणार संरक्षणराज्यातील १ कोटी ५२ लाख खातेदार शेतकरी व खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य त्यामध्ये आई-वडील,पती-पत्नी मुलगा किंवा अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती.वयाची अट१० ते ७५ वयोगटांतील कोणत्याही व्यक्तीस शिवाय प्रत्येक दिवसाच्या २४ तासांसाठी योजना लागू राहील.किती मिळणार भरपाई

  • मृत्यू झाल्यास २ लाख, दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय किंवा एकाचवेळी एक हात
  •  एक पाय व एक डोळा निकामी झाल्यासही २ लाख मिळणार
  • एक डोळा, एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास १ लाख रुपये मिळणार

विमा हप्त्याचे काययोजनेंतर्गत शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही विमा कंपनीकडे स्वतंत्ररित्या विमा हप्ता भरण्याची गरज नाही. ही संपूर्ण रक्कम शासनामार्फत विमा कंपनीकडे भरली जाईल. शेतकऱ्यांने स्वतंत्रपणे अन्य कोणत्याही विमा योजनेचे संरक्षण जरी घेतले असले तरी त्याचा योजनेशी काही संबंध नाही. या योजनेंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्रच असेल.

टॅग्स :Gopinath Mundeगोपीनाथ मुंडेAccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्रkolhapurकोल्हापूर