शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रियायुक्त पाण्याचा शेतकऱ्यांना लाभ

By admin | Updated: May 25, 2015 00:38 IST

मोफत पुरवठा : टप्प्या-टप्प्याने सहाशे एकरांचे होणार नंदनवन; नदीचे प्रदूषण कमी

इचलकरंजी : येथील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या शुद्ध पाण्याच्या वापरातून परिसरातील सुमारे तीनशे शेतकऱ्यांची शेती पिकणार आहे. ही सुविधा वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसिंग असोसिएशन व राणा प्रताप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. ज्यामुळे प्रक्रिया केलेले पाणी पुन्हा नदीत मिसळणार नाही. त्यामुळे प्रदूषणही काही अंशी कमी होईल. उलट मोफत मिळणाऱ्या पाण्यामुळे टप्प्या-टप्प्याने सहाशे एकर शेतीचे नंदनवन होण्याची शक्यता आहे.इचलकरंजीतील वाढत्या वस्त्रोद्योगाबरोबर येथे उत्पादीत कापडावर प्रक्रिया करण्यासाठी प्रोसेसर्स कारखान्यांची संख्या वाढली. त्यामुळे शहरात १२ पॉवर प्रोसेसर्स, ८ स्ट्रेंटर, ५० ब्रॅँड प्रोसेसर्स व काही संस्था स्थापित झाल्या. त्यातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्याने मोठे-नाले आणि पंचगंगा नदीचे पाणी दूषित होऊ नये. यासाठी वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसिंग असोसिएशनने इचलकरंजी टेक्स्टाईल क्लस्टर योजनेतून १२ दशलक्ष लीटर पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभा केला. त्यातून प्रक्रिया केल्यानंतर सुमारे दहा लक्ष लीटर शुद्ध पाणी बाहेर पडते. हे पाणी शेतीला सिंचनास देण्यास आमदार सुरेश हाळवणकर यांनी पुढाकार घेतला.आता वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसिंग असोसिएशनने हे पाणी शेती सिंचनास देण्यास दीड किलोमीटर अंतराची पाईप टाकून साईट क्रमांक १०२ जवळ एका चेम्बरला दिले आहे. तेथून हे पाणी शेती सिंचनासाठी सायफन पद्धतीने दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दीडशे एकर शेतीस पाणी पुरविले जाईल आणि टप्प्याटप्प्याने सहाशे एकर जमिनीस हे पाणी वितरीत होईल, अशी माहिती सेवा संस्थेचे प्रमुख अरूण पाटील यांनी सांगितली. (प्रतिनिधी)इचलकरंजी शहरातून दररोज ३५ ते ४० दशलक्ष लीटर सांडपाणी तयार होते. मात्र सध्या फक्त २० दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. याशिवाय काळा ओढा व चंदूर नाला या दोन ठिकाणी आणखीन दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा करून ते प्रक्रिया केलेले पाणी सुद्धा शेतीसिंचनास देण्यात येईल आणि अशा पाण्याची रोज ३८ दशलक्ष लीटर उपलब्धी असेल, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.