शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव : बांधकाम विभागाच्या निवासस्थानी जप्त केल्या त्या बनावट नोटा, एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 12:56 IST

बेळगाव पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत बनावट नोटांचा साठा जप्त केला होता. या बनावट नोटा तब्बल ७ कोटी रुपयांच्या असून त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सरकारी निवासस्थानावर घातलेल्या छाप्यात आढळल्या आहेत.

ठळक मुद्देबांधकाम विभागाच्या निवासस्थानी जप्त केल्या सात कोटींचा बनावट नोटाजप्त बनावट नोटा सात कोटींच्या, एकास अटक

बेळगाव : बेळगाव पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत बनावट नोटांचा साठा जप्त केला होता. या बनावट नोटा तब्बल ७ कोटी रुपयांच्या असून त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सरकारी निवासस्थानावर घातलेल्या छाप्यात आढळल्या आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी विजापूर येथील रहिवाशी अजित निडोनी या व्यक्तीस अटक केली असून या बनावट नोटा ५०० आणि २००० रुपयांच्या बनावट नोटा आहेत. हा साठा मध्यरात्री बेळगाव पोलिसांनी जप्त केल्या आहे.या नोटा हुबेहूब खऱ्या नोटांसारख्या दिसतात. सदाशिवनगर मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंजुनाथ बागलकोटी यांच्या शासकीय निवासस्थानी हा साठा सापडला आहे. निवडणुकीत वाटण्यासाठी या नोटा आणल्या असाव्यात असा संशय यामुळे आता बळावला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मंजुनाथ आणि अजित हे दोघे मित्र आहेत.पोलीस आयुक्त डी. सी. राजप्पा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मोठ्या बंदोबस्तात पहाटेपर्यंत मोजदाद सुरू होती. याचवेळी दुसऱ्या पथकाने निडोनी यास अटक केली.सदाशिवनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या एका तिजोरीत या बनावट नोटांचा साठा करण्यात आल्याचे आढळून आले. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीही याची दाखल घेतली असून त्यांच्याकडून रात्री उशीरा पर्यंत पंचनामा सुरुहोता.

आता या नोटा कुठे छापल्या आणि कुणासाठी त्या वाटणार होते याचा तपास सुरू आहे. निडोनी याला यापूर्वीही बनावट नोटा छापल्याप्रकरणी अटक झाली होती. या प्रकरणातील तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, यामुळे पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Note Banनोटाबंदीkolhapurकोल्हापूर