शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव जिल्ह्यातून दोघांना मंत्रीपद, सवदी-शशिकला जोल्ले यांनी घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 17:21 IST

बेळगाव जिल्ह्यातून लक्ष्मण सवदी आणि शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांनी कर्नाटक  मंत्रिमंडळाचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. इतर सर्व इच्छुकांना फाटा देण्यात आला आहे, त्यामुळे नाराजी वाढणार असल्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देबेळगाव जिल्ह्यातून दोघांना मंत्रीपदसवदी-शशिकला जोल्ले यांनी घेतली शपथ

बेळगाव  : बेळगाव जिल्ह्यातून लक्ष्मण सवदी आणि शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांनी कर्नाटक मंत्रिमंडळाचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. इतर सर्व इच्छुकांना फाटा देण्यात आला आहे, त्यामुळे नाराजी वाढणार असल्याची शक्यता आहे.

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुराप्पा यांनी अखेर राज्यपालांकडे आपल्या प्रस्तावित मंत्रिमंडळाचे पत्रक आणि यादी सादर केल्यानंतर आज त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला आहे. 17 जणांची यादी सादर करण्यात आली होती. आज सकाळी साडेदहा ते साडे अकराच्या काळात राजभवन येथे या मंत्र्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील नेते उमेश कत्ती, भाजपचे भालचंद्र जारकीहोळी यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळणार अशी चर्चा होती. या बरोबरच अनेक जण इच्छुक होते. आठ वेळा आमदार असलेल्या उमेश कत्ती यांना बाजूला सारत मागील  विधानसभा निवडणुकीत अथणी मतदारसंघात निवडणूक हरलेल्या माजी मंत्री लक्ष्मण सवदी यांना संधी मिळाली आहे.आपल्याला मंत्रीपद मिळणार म्हणून काही नवीन आमदारही गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. पण यावेळी नाराजी वाढली आहे. यावेळी भाजपमधील प्रत्येक जणच मंत्रिपदासाठी इच्छुक असताना 17 जणांची यादी तयार केली असून यामध्ये गोविंद कारजोळ, अश्वथ नारायण सी एन, के एस ईश्वराप्पा, आर अशोक ,जगदीश शेट्टर , बी श्रीरामलु, एस सुरेश कुमार, व्ही सोमन्ना, सिटी रवी, बसवराज बोंमाई, कोटे श्रीनिवास पुजारी, जेसी मधू स्वामी , चंद्रकांतगौडा पाटील, एच नागेश, प्रभू चव्हाण यांच्या बरोबरीने लक्ष्मण सवदी व शशिकला जोल्ले यांनी शपथ घेतली आहे.माजी आमदार लक्ष्मण सवदी हे दुसऱ्यांदा मंत्री बनले आहेत तर दुसऱ्यांदा निपाणीच्या आमदार बनलेल्या शशिकला जोल्ले या प्रथमच कॅबिनेट मंत्री बनल्या आहेत. बंडखोर आमदारांना मुंबईत स्थलांतर करण्यात खासदार अण्णासाहेब जोल्ले, त्यांच्या पत्नी आमदार शशिकला जोल्ले व अथनीचे माजी आमदार माजी मंत्री लक्ष्मण सवदी या दोघांनी मोलाची भूमिका बजावली होती, त्यामुळेच त्या दोघांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली आहे.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगाव