शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मर्दासारखं वाग जरा... गाण्यातून गडांचे पावित्र्य राखण्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 13:11 IST

Shivjayanti Fort Kolhpaur-शिवरायांचे गडकिल्ले ही आपली अस्मिता असून ती जपली पाहिजे. त्यासाठी गडांचे पावित्र्य राखा, असा संदेश देणारे मर्दासारखं वाग जरा... हे साडेतीन मिनिटांचे गाणे शिवजयंतीच्या निमित्ताने बुधवारी प्रसारित करण्यात आले. यु ट्यूबवर प्रसारित करण्यात येणाऱ्या या गाण्याची निर्मिती हर्षल सुर्वे यांनी केली असून आमदार ऋतुराज पाटील यावेळी उपस्थित होते.

ठळक मुद्देमर्दासारखं वाग जरा... गाण्यातून गडांचे पावित्र्य राखण्याचा संदेशशिवजयंतीच्या निमित्ताने गाणे प्रसारित

कोल्हापूर : शिवरायांचे गडकिल्ले ही आपली अस्मिता असून ती जपली पाहिजे. त्यासाठी गडांचे पावित्र्य राखा, असा संदेश देणारे मर्दासारखं वाग जरा... हे साडेतीन मिनिटांचे गाणे शिवजयंतीच्या निमित्ताने बुधवारी प्रसारित करण्यात आले. यु ट्यूबवर प्रसारित करण्यात येणाऱ्या या गाण्याची निर्मिती हर्षल सुर्वे यांनी केली असून आमदार ऋतुराज पाटील यावेळी उपस्थित होते.गडकिल्ल्यांवर केली जाणारी ओली पार्टी, अश्लील प्रकार, बार, परमिटरूम आणि वाईन शॉप यांना देण्यात येणारी गडकिल्ल्यांची नावे, याऐवजी गडांकडे शौर्यपीठ, शक्तिस्थान म्हणून पाहावे आणि शिवरायांची अस्मिता जपावी, असा संदेश या गाण्यातून तरुणाईला देण्यात आला आहे.

हर्षल सुर्वे यांनी स्वत: प्रथमच गायिले गाणेआमदार ऋतुराज पाटील, हर्षल सुर्वे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या गाण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी सहकार्य केले आहे. स्वत: हर्षल सुर्वे यांनी प्रथमच हे गाणे गायिले आहे. पन्हाळा आणि पावनगड या किल्ल्यांवर झालेल्या चित्रीकरणात सुमारे ४० स्थानिक कलाकारांचा समावेश आहे. या गाण्याचे लेखन, संगीत, संकलन, छायांकन कोल्हापुरातील तंंत्रज्ञ आणि कलाकारांनी केले असून मुंबईचे नितीन जाधव यांनी दिग्दर्शन केले आहे.

यांनी केले विशेष सहकार्यऐश्वर्य मालगावे हे संगीतकार असून युवराज पाटील हे गीतकार आहेत. शेखर गुरव यांचे संकलन, चेतन कुंभार यांचे छायांकन, दत्तात्रय जगताप यांची रंगभूषा असून सुचित पोतदार यांनी पोस्टर, अजय हारुंगले यांचे छायाचित्रण, तर ओंकार झिरंगे यांनी ड्रोनचे व्यवस्थापन केले आहे. निर्मिती ग्राफिक्सचे अनंत खासबारदार, कुलदीप शिंगटे, अभिनेता स्वप्नील राजशेखर, अब्दुल रझाक पटेल, अमित अडसूळ यांनी विशेष सहकार्य केले आहे.

बार, परमिट रूम आणि वाईन शॉप यांना गडकिल्ल्यांची नावे देऊ नयेत यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे.- ऋतुराज पाटील ,आमदार

टॅग्स :Shivjayantiशिवजयंतीmusicसंगीतkolhapurकोल्हापूरFortगड