शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

देशाला विश्वगुरू होण्याआधी विश्वमित्र बनावे लागेल : रघुनाथ माशेलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:50 IST

'निरक्षरता, गरिबी, भूकबळी या समस्यांचे आव्हान असणाऱ्या भारत ७५ आणि वेगाने पुढे जाणाऱ्या इंडिया ७५ यांच्यातील दरी आधी संपवावी'

कोल्हापूर : भारताची अर्थव्यवस्था ३० ट्रिलियन डॉलर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, परंतु ही वाढ नुसतीच नको. निरक्षरता, गरिबी, भूकबळी या समस्यांचे आव्हान असणाऱ्या भारत ७५ आणि वेगाने पुढे जाणाऱ्या इंडिया ७५ यांच्यातील दरी आधी संपवावी. देशाला विश्वगुरू होण्याआधी विश्वमित्र बनावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.आजरा येथील ज्येष्ठ पत्रकार, शिवभक्त, शिक्षक सु. रा. देशपांडे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. माशेलकर यांना सु. रा. देशपांडे स्मृती गौरव पुरस्कार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते देण्यात आला.डॉ. माशेलकर म्हणाले, भारतातील टायर थ्री शहरात राहणारे ५० टक्के नागरिक अजूनही गरीब आहेत. शंभरपैकी फक्त २४ महानगरेच विकसित झालीत. देशातील प्रत्येक सहावी व्यक्ती झोपडपट्टीत राहते. सहापैकी एक व्यक्ती अजूनही निरक्षर आहे. १५ टक्के लोक गरीब आहेत. हा बदल झाला तरच देश विश्वगुरू बनेल. एकीकडे नवीन पिढीच्या आकलनाचा वेग इतका मोठा आहे, की त्यांच्यासाठी शिक्षकांची कमतरता भासणार आहे, दुसरीकडे हुशार मुलांना गरिबीमुळे, तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध न झाल्यामुळे आत्महत्या करावी लागते.

नव्या भारताचे सूत्रडॉ. माशेलकर यांनी नवा भारत कसा असावा याचे सूत्र मांडले. संतुलित, स्त्री-पुरुषांना समान संधी असलेला, जातीपातीच्या पलीकडच्या भारताची संकल्पना मांडली. यामध्ये सांस्कृतिकतेचा अभिमान असलेला, इतर धर्माचा आदर करणारा, शिक्षणाचा योग्य मार्ग आणि अधिकार, नुसते श्रीमंत, गरिबीची दरी वाढवणारी समृद्धी नको, कुपोषणमुक्त, योग्य अन्नाचे पोषण आणि आनंदी असणारा समाज अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर