शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

खासगी दवाखान्यांतील बेड ७०० पर्यंत वाढवणार : मल्लिनाथ कलशेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 16:47 IST

कोरोना रुग्णांसाठी खासगी दवाखान्यांमध्ये सध्या ५४८ बेड असून ते ७०० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. ॲन्टिजेन टेस्टसाठी १० हजार किट मिळाले असून त्यांपैकी दोन हजार किट आयसोलेशनला देण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी  दिली.

ठळक मुद्देखासगी दवाखान्यांतील बेड ७०० पर्यंत वाढवणार : मल्लिनाथ कलशेट्टी ॲन्टीजेन टेस्टचे १० हजार कीट उपलब्ध

कोल्हापूर : कोरोना रुग्णांसाठी खासगी दवाखान्यांमध्ये सध्या ५४८ बेड असून ते ७०० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. ॲन्टिजेन टेस्टसाठी १० हजार किट मिळाले असून त्यांपैकी दोन हजार किट आयसोलेशनला देण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी  दिली.आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शहरातील ३३ खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यानंतर जिल्हाधिकारी देसाई व आयुक्त कलशेट्टी यांनी पत्रकारांना माहिती दिली.

ते म्हणाले, कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी दवाखाने आता पुढे येत असून, त्यांनी बेड वाढवण्याचीही तयारी दर्शवली आहे. सध्या ५४८ बेड उपलब्ध असून त्यापैकी २२३ ऑक्सिजन बेड, ९१ नॉन ऑक्सिजन, ४१ व्हेंटिलेटर, १३४ आयसीयूचे आहेत. जिल्ह्यासाठी ॲन्टिजेन टेस्टचे पुरेसे किट उपलब्ध झाले असून सध्या सर्वाधिक चाचण्या आयसोलेशनद्वारे होत आहेत. ज्या खासगी दवाखान्यांना ॲन्टिजेन टेस्टच्या किट हवे आहेत त्यांनी लॉगीन केल्यास एका दवाखान्यास २५ किट दिले जातील.बाहेर आलात तर कोविड केंद्रात ठेवणारजिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, होम क्वारंटाईन असलेले तसेच घरातच उपचार घेत असलेले रुग्ण बाहेर फिरत असल्याचे प्रकार घडत आहेत. ही बाब निदर्शनास आल्यास त्या व्यक्तीला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाईल. सध्या ५१८ व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये असून त्यांपैकी २८५ जणांवर महापालिका दवाखान्यांमार्फत, तर २३३ शहरातील विविध दवाखान्यांमार्फत उपचार घेत आहेत. त्यांना उपचाराचे किट प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्तkolhapurकोल्हापूर