शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
3
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
4
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
5
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
6
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
7
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई
8
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
9
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका
10
तीन कोटींचे बक्षीस असलेला नक्षली नेता सुधाकर ठार; सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
11
चर्चगेट स्थानकात आगीमुळे पळापळ; ऐन गर्दीच्या वेळी दुर्घटना; फलाटांवर धुराचे लोट
12
वाशी- मानखुर्द प्रवास आता सुसाट वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण
13
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
14
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
15
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
16
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
17
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
18
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
19
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
20
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई

कलाकारांच्या साक्षीने व्हा सखी सदस्य

By admin | Updated: January 23, 2015 00:41 IST

आजपासून प्रारंभ : श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, अभिजित सावंत यांची उपस्थिती

सांगली : मनोरंजनाचे नवे रंग भरतानाच अविस्मरणीय कार्यक्रमांची भेट यंदा सखी मंच सदस्यांना मिळणार आहे. आज (शुक्रवारी) सकाळी १० वाजता यंदाच्या नव्या योजनेचा प्रारंभ सिनेकलाकारांच्या साक्षीने होत आहे. अभिनेते श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर आणि गायक अभिजित सावंत यांच्या उपस्थितीत सदस्य होण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील महिलांसाठीची ही योजना शुक्रवारपासून सुरू होत आहे. सांगलीच्या भावे नाट्यगृहात सकाळी साडेअकरा वाजता सिनेकलाकारांच्या साक्षीने सदस्य होता येणार आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेण्यासाठी महिला सदस्यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे. प्रारंभाच्या दिमाखदार सोहळ््याचे साक्षीदार होताना वर्षभर मनोरंजनाच्या विविक कार्यक्रमांचा आनंद लुटता येणार आहे. गतवर्षी ज्या महिलांनी सदस्य होऊन वर्षभर मनोरंजनपर कार्यक्रमांचा आस्वाद घेतला त्यांच्यासह नव्या सदस्यांनाही योजनेमध्ये सामावून घेतले जाणार आहे. सदस्य नोंदणीचा कार्यक्रम २३ जानेवारीपासून आठ दिवस इतक्या मर्यादित कालावधीसाठीच आहे. अनेक वैशिष्ट्यांनी यंदाची योजना सजली आहे. सदस्य नोंदणीसाठी रु.३५० इतके शुल्क असून नोंदणीवेळीच पाचशे रुपयांचा तीन कढर्इंचा सेट तसेच सांगलीच्या ‘सुवर्णस्पर्श’तर्फे अकराशे रुपये किमतीच्या दोन बांगड्या भेट म्हणून दिल्या जाणार आहेत. याशिवाय तब्बल ५ हजार रुपये किमतीची मोफत कुपन्स्, शंभर रुपये किमतीचे ‘माय डायट बुक’, एक लाखाचा अपघाती मृत्यू विमा, एक लाख साठ हजार रुपयांचा लकी ड्रॉ आणि राज्यस्तरीय लकी ड्रॉमधून ‘ह्युंडाई आयटेन’ कार जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सदस्य नोंदणी केली जाणार आहे. याचवेळी अभिनेते श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर व अभिजित सावंत उपस्थित राहणार असून, त्यांच्याहस्ते सखी मंच सदस्य नोंदणीस सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)सदस्य होण्यासाठी काय करावे...सखी सदस्य होण्यासाठी महिलांनी ३५0 रुपये नोंदणी शुल्क भरावे.सदस्यत्वाचा अर्ज भरून तो सांगलीतील ‘लोकमत’ कार्यालयाकडे जमा करावा.सदस्य नोंदणीनंतर लगेचच सखी सदस्यांना ओळखपत्र, कूपन, तसेच भेटवस्तू देण्यात येईल.सांगली, मिरजेतील कार्यालयांसह कमिटी मेंबर्सकडे अर्ज उपलब्ध आहेत. सांगलीतील महिलांनी ‘लोकमत’ कार्यालय, कलाश्री आर्केड, राम मंदिरजवळ सांगली याठिकाणी संपर्क साधावा. कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावरही (क्र. २६२५९६२, ९६0४0८८३८८, ८४८२८३६१८0) संपर्क साधता येईल. कार्यालयीन वेळेत म्हणजे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत नोंदणीसाठी संपर्क साधावा. संगीत कार्यक्रमाने प्रारंभसखी मंच सदस्य नोंदणी अभियानाच्या प्रारंभानिमित्त भावे नाट्यगृहात उद्या शुक्रवारी २३ जानेवारी रोजी साडेअकरा वाजता ‘सारेगम’फेम प्रख्यात गायक मिलिंद कुलकर्णी व निवेदक राजकुमार मगदूम यांचा ‘जिंदगी एक सफर’ हा हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.