शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

चित्रकला आणि चित्रपट यांचा सुरेख समन्वय : पार्श्वनाथ नांद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 16:58 IST

कोल्हापूर : चित्रकला आणि चित्रपट यांचा सुरेख समन्वय चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीने साधला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रकार पार्श्वनाथ नांद्रे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देचिल्लर पार्टीतर्फे बालचित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरणचित्रकला स्पर्धेत १७00 विद्यार्थी सहभागीकार्यक्रमात विश्व शिंदे याचा सत्कारचिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत हॅपी फीट

कोल्हापूर : चित्रकला आणि चित्रपट यांचा सुरेख समन्वय चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीने साधला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रकार पार्श्वनाथ नांद्रे यांनी व्यक्त केले.

चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत रविवारी शाहू स्मारक भवन येथे हॅपी फीट हा बालचित्रपट दाखविण्यात आला. याच कार्यक्रमात चळवळीमार्फत कोल्हापूर महानगरपालिकेतील शाळेसाठी घेण्यफात आलेल्या बालचित्रकला स्पधेर्चे बक्षीस वितरण पार्श्वनाथ नांद्रे यांच्या हस्ते पार पडले.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना नांद्रे यांनी आपला चित्रकलेचा प्रवास उलगडला. चिल्लर पार्टीच्या ओंकार कांबळे याने प्रास्तविक भाषणात चिल्लर पार्टीच्या हेतूची माहिती दिली. विशाल चव्हाण याने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला. छायाचित्रकार जयसिंग चव्हाण यांच्या हस्ते नांद्रे यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत करण्यात आले. साक्षी सरनाईक हिने आभार माने तर अनुजा बकरे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी रविंद्र शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विश्व शिंदे याचा सत्कार

सुदैवा फुटबॉल क्लबतर्फे दिल्ली येथे होणाºया प्रशिक्षणासाठी १५ वषार्खालील गटात निवड झालेल्या कोल्हापूरातील विश्व विजय शिंदे या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांचा चिल्लर पार्टीतर्फे पार्श्वनाथ नांंद्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.बालचित्रकला स्पधेर्तील विजेते विद्यार्थीसावली देवरुखकर, उज्वला सकट, स्वाती सोनटक्के, सेजल परिहार, जिया मुजावर, शिल्पा बोडेकर, प्रथमेश मोरे, प्रणित पटील, विनायक कांबळे, स्नेहल बडवे, यश लाड, रोहन सुतार, ज्ञानेश्वर तपशी, अनिकेत सोनवणे, साक्षी जाधव, नारायणी सहानी, अनिसा मणेर, अमृता केंगार, प्रेम लोहार, मोनिका नाईक, अथर्व निकम, रेहान बागवान, श्वेता साळवी, मंदार असबे, सोहम पोवार, अबरार गवंडी, झैनाब शेख.चित्रकला स्पर्धेत १७00 विद्यार्थी सहभागी

या बाल चित्रकला स्पर्धेत महानगरपालिकेच्या १७00 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पधेर्तील बक्षीस विजेत्या विद्यार्थ्याच्या चित्रांचे प्रदर्शन शाहू स्मारक भवनाच्या आवारात प्रदर्शित करण्यात आले होते.