शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पाचगाव, कदमवाडीत  किरकोळ कारणावरून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 17:01 IST

Crimenews Kolhapur- फार्म हाऊसच्या गेटसमोर लघुशंका करू नका, असे सांगणाऱ्या युवकासह त्याच्या भावास अज्ञात तिघा जणांनी पाचगाव (ता. करवीर) येथे मारहाण केली तर कदमवाडीत सिगरेट नाही म्हटल्याच्या कारणावरून दोघांनी केलेल्या मारहाणीत एक जण जखमी झाला

ठळक मुद्देपाचगाव, कदमवाडीत  किरकोळ कारणावरून मारहाणपोलिसांनी केला गुन्हा नोंद

कोल्हापूर : फार्म हाऊसच्या गेटसमोर लघुशंका करू नका, असे सांगणाऱ्या युवकासह त्याच्या भावास अज्ञात तिघा जणांनी पाचगाव (ता. करवीर) येथे मारहाण केली तर कदमवाडीत सिगरेट नाही म्हटल्याच्या कारणावरून दोघांनी केलेल्या मारहाणीत एक जण जखमी झाला

पोलिसांनी दिलेली माहिती माहिती अशी, फिर्यादी घोरपडे यांचे पाचगाव (ता. करवीर) येथे लक्ष्मी निवास फार्म हाऊस आहे. मंगळवारी (दि.१६) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास गेंडा ऊर्फ डॉन नावाच्या इसमाने फार्म हाऊसच्या गेटसमोर लघुशंका केली, यावर फिर्यादीने त्यांना इथे असे कृत्य करू नका, पुढे जा, असे सांगितले. मी कोण आहे माहीत आहे का? मी डॉन आहे. गेंडा बाई म्हणतात मला, असे म्हणत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्यासोबत असलेल्या दोन अन्य अनोळखी इसमांनीही मारहाण केली. 

याबाबत नीलेश महादेव घोरपडे (वय ३१, रा. समर्थ कॉलनी, संभाजीनगर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात गेंड्या नावाच्या अज्ञात इसमासह दोघांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला. फिर्यादीसोबत असलेला त्याचा भाऊ निशाण यालादेखील या तिघांनी मारहाण केली. जाताना चारचाकीच्या काचाही फोडल्या. याचा तपास पोलीस नाईक गुरव करीत आहेत. कदमवाडीत मारहाणीत एक जण जखमीकोल्हापूर : सिगरेट नाही म्हटल्याच्या कारणावरून कदमवाडीत दोघांनी केलेल्या मारहाणीत एक जण जखमी झाला. याबाबतची फिर्याद शंकर अरुण शिंदे (वय २८, मूळ रा. बिळाशी, ता. शिराळा, जि. सांगली, सध्या रा. अयोध्या मित्रमंडळ चौक, कदमवाडी, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिसांत बुधवारी सायंकाळी दिली. त्यानुसार गुन्हा नोंद झालेल्यांमध्ये अधिक ऊर्फ पप्पा डाळके, संदीप ऊर्फ विक्रम पाटील, दोघे रा. कदमवाडी) अशी संशयितांची नावे आहेत.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी (दि. १६) रात्री पावणेबारा वाजता संशयित डाळके यांनी फिर्यादी शिंदे यांच्या अयोध्या चौकातील दुकानात येऊन सिगारेट मागितली. त्यांनी ती नाही म्हटल्यानंतर संशयिताने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ का करतोस, अशी फिर्यादीने विचारणा केली असता संशयिताने पाटील यास फोन करून बोलावून घेतले.

यादरम्यान संशयित पाटील याने थेट आल्यानंतर फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी पाइपने मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान संशयिताने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. घडलेल्या प्रकाराबाबत फिर्यादीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात या दोन संशयितांविरुद्ध फिर्याद दिल्यानुसार गुन्हा दाखल झाला. याबाबतचा तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर