यांनी चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सतीश जेलुगडेकर याने शिवकन्या वाघीण ग्रुप या नावाने व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करून त्यात तक्रारदार महिलेला ॲड करून ग्रुपचा व्हिडिओ तयार करण्याकरिता फोटो मागितले होते. त्यावेळी घारे या ग्रुपमधून लेफ्ट झाल्या. त्या गोष्टीचा मनात राग धरून आरोपी याने १३ फेब्रुवारी रोजी त्याच्या मोबाइल नंबर यावरून निखिल नंदकुमार माने यांचा मोबाइलवर फोन करून आत्महत्या करणार, अशी धमकी दिली. त्यावेळी तक्रारदार व साक्षीदार हे आरोपी याच्या घरी गेले असता त्याने तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये पुन्हा ॲड व्हा, नाही तर मी स्वतःचे बरेवाईट करून तुम्हाला अडकवीन, अशी धमकी दिली. याबाबत घारे यांनी चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
व्हाॅट्सॲप ग्रुपद्वारे महिलांशी गैरवर्तणूक करणाऱ्याला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST