शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

कोल्हापूर जिल्ह्यात बॉक्साईट उत्खनन पुन्हा सुरू होणार, शासनाच्या हालचाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 13:55 IST

पश्चिम घाटात वसलेल्या तालुक्यात गेली अनेक वर्षे मायनिंग प्रकल्प सुरू आहेत. मग आजअखेर या तालुक्यात विकास का झाला नाही?

कोल्हापूर : केंद्राच्या अधिसूचनेप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील १८४ गावांचा संवेदनशील क्षेत्रात समावेश आहे. यातील ३१ गावे वगळावीत, अशी राज्य शासनाची मागणी आहे. यापैकी १७ गावांत बॉक्साईटचे उत्खनन सुरू करण्यासाठी, एका गावात औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) निर्माण करण्यासाठी आणि उर्वरित १३ गावे संवेदनशील क्षेत्राबाहेर असल्याने ती सर्व गावे वगळण्याची मागणी राज्य शासनाने केंद्राकडे केली आहे. ती जर वगळली, तर कोल्हापूर जिल्हा पुन्हा बॉक्साईट उत्खननाच्या विळख्यात अडकेल, अशी भीती ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. मधुकर बाचूळकर यांनी सोमवारी व्यक्त केली. तज्ज्ञांनी, अभ्यासकानी, पर्यावरणप्रेमींनी संवेदनशील क्षेत्रातील कोणतीही गावे वगळू नयेत, अशी मागणी करणारी पत्रे, ई-मेल केंद्र व राज्य शासनाला पाठवावीत, असे आवाहन डॉ. बाचूळकर यांनी केले आहे.डॉ. के. कस्तुरीरंगन समितीच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, पश्चिम घाटातील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांची व यामध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांची यादी केंद्र शासनाने २०१३ मध्ये जाहीर केली. यामध्ये सहा राज्यांतील ५९९९४० चौ. किलोमीटर क्षेत्र पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले. पण या निर्णयास सर्व सहा राज्यांनी विरोध सुरू केला. आता महाराष्ट्रानेही राज्यासाठी जाहीर केलेल्या १७३४० चौ. किलोमीटर संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट २१३३ गावांपैकी ३८८ गावे वगळण्याची मागणी केंद्राकडे केली आहे.आजरा तालुक्यातील हाजगोळी खुर्द व केराकबोळ, भुदरगड तालुक्यातील बिद्री, हणबरवाडी, मुरुकाटे, फणसवाडी, राधानगरी तालुक्यातील करंजफेण, सावर्डे, शाहूवाडी तालुक्यातील ऐनवाडी, म्हाळसवडे, पणुंद्रे, शिराळे तर्फे मलकापूर, सोनुर्ले ही १३ गावे संवेदनशील क्षेत्राबाहेर असल्याचा राज्य शासनाचा दावा आहे. चंदगड तालुक्यातील ओगोली, धामापूर, कानूर खुर्द, पिलानी, पुंद्रा, शाहूवाडी तालुक्यातील बुरंबाळ, धनगरवाडी, गिरगाव, मानोली, निवळे, शिराळे तर्फे वारूण, उदगिरी, येळवण जुगाई, राधानगरी तालुक्यातील पडसाळी, पाटपन्हाळा व रामनवाडी आणि भुदरगड तालुक्यातील वासणोली अशा एकूण १७ गावांत उत्खनन सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. भुदरगडमधील देवकेवाडी येथे औद्योगिक वसाहत निर्मितीचा विचार आहे, यासाठी ही १८ गावे वगळावीत, अशी मागणी केंद्राकडे केली आहे. राधानगरी, शाहूवाडी, चंदगड, आजरा, भुदरगड या पश्चिम घाटात वसलेल्या तालुक्यात गेली अनेक वर्षे मायनिंग प्रकल्प सुरू आहेत. मग आजअखेर या तालुक्यात विकास का झाला नाही? असा प्रश्न डॉ. बाचूळकर यांनी विचारला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर