शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळच्या रणांगणात आता विनय कोरेही विरोधी छावणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 13:23 IST

कोल्हापूर : गोकुळच्या रणांगणात माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्यानंतर आता आमदार विनय कोरेही विरोधी छावणीत दाखल झाले आहेत. ग्रामविकास ...

ठळक मुद्देमंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यासोबतच्या बैठकीनंतर निर्णय जागाबाबत प्राथमिक चर्चा

कोल्हापूर : गोकुळच्या रणांगणात माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्यानंतर आता आमदार विनय कोरेही विरोधी छावणीत दाखल झाले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत रविवारी शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. कोरे गटाला किती जागा द्यायच्या याबाबत प्राथमिक चर्चा झाली असून अंतिम निर्णय येत्या आठवड्यात घेतला जाणार आहे.ह्यगोकुळह्णच्या निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या विरोधात तगडे पॅनेल करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांनी कंबर कसली आहे. सत्तारूढ गटाला हादरे देण्याची एकही संधी सोडत नाहीत. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्यासह सहा संचालकांना आपल्याकडे वळविले. विशेष म्हणजे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर हे आपल्यासोबतच राहतील, अशी अटकळ सत्तारूढ गटाच्या नेत्यांना होती. मात्र, राज्यातील आकारास आलेली महाविकास आघाडी आणि शिवसेना नेत्यांचा एकसंध राहण्याच्या दबावामुळे त्यांनी विरोधी आघाडीसोबत राहण्याची भूमिका घेतली. आमदार विनय कोरे हे राज्यात भाजपसोबत आहेत, त्यामुळे ते सत्तारूढ आघाडीसोबत राहणार, अशीच अटकळ होती. मात्र, रविवारी मंत्री मुश्रीफ, सतेज पाटील, के. पी. पाटील व विनय कोरे यांची तासभर शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. यामध्ये कोरे गटाला किती जागा द्यायच्या यावर चर्चा झाली.कोट-ह्यगोकुळह्णच्या राजकारणात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. कोरे गटाला किती जागा द्यायच्या यावर बैठकीत चर्चा झाली.- आमदार विनय कोरे

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकHasan Mushrifहसन मुश्रीफSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलVinay Koreविनय कोरेkolhapurकोल्हापूर