इचलकरंजी : रॅपिअर कारखानदारांची बेसिक क्वॉलिटीची मजुरी १ सप्टेंबरपासून नवीन व्यवहार हे १५.५० पैसे प्रतिपीक या मजुरीप्रमाणे करण्याचा निर्णय झाला, अशी माहिती पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी बैठकीत दिली.
कोरोना महामारीमुळे यापूर्वी झालेल्या किमान १५.५० पैसे प्रतिपीक देण्याच्या निर्णयाला शिथिलता दिली होती. मात्र, आता येणारे सणासुदीचे दिवस व लग्नसराई असल्याने कापडाच्या मागणीचा विचार करता, १५.५० चा निर्णय लागू करण्यात आला. तसेच पेमेंटधारा व अन्य विषयांवर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. पेमेंटधारेबाबतचा निर्णय येत्या आठ दिवसांत घेण्याचे ठरले. बैठकीस संचालक चंद्रकांत पाटील, सुभाष बलवान, सुकुमार देवमोरे, कृष्णात कुंभोजे, शिलकुमार पाटील, महावीर खवाटे, विजय पाटील, कुमार चौगुले यांच्यासह रॅपिअर कारखादार उपस्थित होते.