शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आधार केंद्रे आता सरकारी कार्यालयात, १६ कीट जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 12:18 IST

आधार केंद्रांतून भरमसाट पैसे आकारून नागरिकांची लुबाडणूक होत आहे, अशा स्वरुपाच्या तक्रारी नागरिकांसह खासदार, आमदारांकडून शासन व प्रशासनाकडे आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांना चाप बसण्याकरिता ही खासगी जागेतील आधार केंद्रे बंद करून ती सरकारी जागेत स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास १६ कीट जिल्हा प्रशासनाकडे जमा झाली आहेत. ही कार्यवाही अशाच पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआधार केंद्रे आता सरकारी कार्यालयात, १६ कीट जमा : गैरप्रकारांना चाप बसण्यासाठी कार्यवाही

कोल्हापूर : आधार केंद्रांतून भरमसाट पैसे आकारून नागरिकांची लुबाडणूक होत आहे, अशा स्वरुपाच्या तक्रारी नागरिकांसह खासदार, आमदारांकडून शासन व प्रशासनाकडे आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांना चाप बसण्याकरिता ही खासगी जागेतील आधार केंद्रे बंद करून ती सरकारी जागेत स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास १६ कीट जिल्हा प्रशासनाकडे जमा झाली आहेत. ही कार्यवाही अशाच पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार आहे.जिल्ह्यात महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून जवळपास ८० आधारकेंद्रे सुरू आहेत. या केंद्रांचे कीट सरकारी असून, ते जिल्हा प्रशासनाने दिले आहे. या खासगी केंद्रातून जादा पैसे आकारले जात असल्याबाबत तक्रारी आल्या आहेत. ही खासगी केंद्रे काढून घेऊन ती शासनाच्या माध्यमातून चालवावीत, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संबंधितांना आधार केंद्रांचे कीट जमा करण्याबाबत गेल्या सहा महिन्यांपूर्वी कळवून पाठपुरावा सुरू ठेवला; परंतु त्यांच्याकडून ही बाब गांभीर्याने घेण्यात आली नव्हती.

पुन्हा याबाबत तक्रारी वाढू लागल्याने माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवास यांनी दोन दिवसांपूर्वी कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून किट जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आतापर्यंत जवळपास १६ आधार केंद्रांची किट जमा करण्यात आली आहेत. हे किट जमा करून सर्व शासकीय कार्यालयात आधार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये आल्यावर त्यावर नियंत्रण राहणार असून मनमानी पैसे घेणाऱ्यांवर चाप बसेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाला आहे. त्यामुळे ही कार्यवाही इथून पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे.कार्यालयाबाहेर असणार दरपत्रकखासगी आधार केंद्रातून होणारी लूट थांबविण्यासाठी ही केंद्रेच शासकीय कार्यालयांमध्ये स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कार्यालयांमध्ये ही केंद्रे आल्यावर बाहेर आधार कार्डाचे दरपत्रकच लावले जाणार आहे. त्या व्यतिरिक्त जादा पैसे घेणाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रारही करता येणार आहे. 

आधार केंद्रातून जादा पैसे घेत असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर त्यावर अंकुश राहण्यासाठी या केंद्रातील कीट जमा करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नागरिकांच्या सोईसाठी येत्या आठ-दहा दिवसांत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ही केंद्रे सुरू करण्याचा प्रयत्न राहील.- संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डkolhapurकोल्हापूर