शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

महापुराचे विघ्न कायम, पंचगंगा इशारा पातळी ओलांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 17:05 IST

सकाळी पावसाचा जोर ओसरल्याने महापुराचे समोर उभे ठाकलेले विघ्न गणपतीबाप्पाच्या साक्षीने दूर होईल या आशेवर दुपारनंतर पाणी फिरले. पावसाचा जोर वाढत गेल्याने सकाळी बंद झालेला राधानगरी धरणाचा एक दरवाजा दुपारी पुन्हा उघडला.

ठळक मुद्देमहापुराचे विघ्न कायम, पंचगंगा इशारा पातळी ओलांडणार६५ बंधारे पाण्याखाली, एनडीआरएफ पथक तैनात

कोल्हापूर: सकाळी पावसाचा जोर ओसरल्याने महापुराचे समोर उभे ठाकलेले विघ्न गणपतीबाप्पाच्या साक्षीने दूर होईल या आशेवर दुपारनंतर पाणी फिरले. पावसाचा जोर वाढत गेल्याने सकाळी बंद झालेला राधानगरी धरणाचा एक दरवाजा दुपारी पुन्हा उघडला.

चार दरवाजातून ७११२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग वाढल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होऊन ती ३७ फुटांवर पोहचली. महापुराची ३९ फुटाची इशारा पातळी गाठण्यास अवघे दोन फूट शिल्लक राहिल्याने नागरीकांमध्ये धास्ती वाढली असून भेदरलेल्या नागरीकांनी स्थलांतरास सुरुवात केली आहे.

६५ बंधारे पाण्याखाली गेल्याने २0 मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून गावांना पाण्याचा वेढा पडू लागला आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफच्या तीन तुकड्यांना पुराचा तडाखा बसणाऱ्या नदीकाठच्या गावांजवळ तैनात करण्यात आले आहे.

शनिवारी गणेश विसर्जनाची लगबग सुरु असताना सकाळी पावसाने कांहीशी उघडीप दिल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता, पण दुपारनंतर मात्र पावसाने जोर पकडला. 

शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ५९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक १२२ मि.मी पाऊस एकट्या गगनबावड्यात झाला आहे. सलग चौथ्या दिवशी तेथे अतिवृष्टी सुरु आहे. आजरा ७६, राधानगरी ६0, शाहूवाडी आणि चंदगड ५४, पन्हाळा ५२, कागल व गडहिग्लज ४२, करवीर २७ तर हातकणंगले व शिरोळमध्ये ६ ते ९ मि.मि पाऊस झाला आहे.

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळ सकाळी ८ वाजता ३५ फूटांवर असणारी पाणीपातळी दुपारी ४ वाजेपर्यंत ३७ फुटांवर पोहचली. बंधाऱ्यातून ४0 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यात दुपारनंतर आणखी वाढ झाली.

पुण्यात मदत व बचावकार्यासाठी आलेली एनडीआरएफची तीन पथके शिरोळ, करवीर तालुक्यात तैनात करण्यात आली. पुराचा तडाखा जास्त बसणाऱ्या चिखली, आंबेवाडी, कुरुंदवाड,निलेवाडी या शंभर टक्के बुडीत गावांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून नदीकाठच्या १२९ आणि पूरबाधीत ३६३ गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व यंत्रणा तैनात करण्याचे नियोजन जिल्हा आपत्ती विभागाकडून सुरु आहे.धरणातील विसर्ग (क्यूसेकमध्ये)

  • राधानगरी ७११२
  • वारणा १४८३५
  • तुळशी १५२१
  • कुंभी ९५0
  • कासारी ७५0
  • काळम्मावाडी १0000
  • कोयना४१५१४
  • अलमट्टी १४४३१३ 

२४ तासात झालेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)हातकणंगले ९, शिरोळ ६, पन्हाळा ५२, शाहूवाडी ५४, राधानगरी ६0, गगनबावडा १२२, करवीर २७, कागल ४१, गडहिग्लज ४२, भूदरगड ५0, आजरा ७६, चंदगड ५३, एकूण ५९७ 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर