शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सर्किट बेंच उद्घाटनाच्या पूर्वतयारीसाठी बार असोसिएशनची दोन दिवसांत बैठक, प्रशासकीय हालचाली गतिमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 18:48 IST

कोल्हापूरकर करणार सरन्यायाधीश गवईंचा विशेष सत्कार

कोल्हापूर : महासैनिक दरबार हॉलमध्ये १६ ऑगस्टला होणाऱ्या सर्किट बेंच उद्घाटन समारंभाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा बार असोसिएशनची बैठक दोन दिवसांत होणार आहे. त्या बैठकीत विविध समित्यांची नियुक्ती करून कामांची जबाबदारी निश्चित होणार आहे. उद्घाटन समारंभात कोल्हापूरकरांच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विशेष आभार व्यक्त केले जाणार आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर समारंभाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे.सर्किट बेंचचे उद्घाटन १६ ऑगस्ट रोजी महासैनिक दरबार हॉलमध्ये होणार आहे. त्या समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहा जिल्ह्यांतील मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. समारंभ संस्मरणीय ठरावा, यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा बार असोसिएशनकडून प्रयत्न सुरू आहेत.त्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा बार असोसिएशनची बैठक लवकरच जिल्हा न्याय संकुलात होणार आहे. त्या बैठकीत वकिलांच्या विविध समित्यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे कामांची जबाबदारी सोपवली जाणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन नियोजन केले जाईल, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांनी दिली.गवईंचा विशेष सत्कारसरन्यायाधीश गवई यांनी पुढाकार घेतल्यामुळेच कोल्हापूरसाठी सर्किट बेंच मंजूर झाले, अशी कोल्हापूरकरांची भावना आहे. याच भावनेतून त्यांचा हृद्य सत्कार करण्याची बार असोसिएशन आणि खंडपीठ कृती समितीची इच्छा आहे. त्यामुळे उद्घाटन समारंभात त्यांचा विशेष सत्कार करण्याचे नियोजन सुरू आहे. तो सत्कार संपूर्ण कोल्हापूरकरांच्या वतीने असणार आहे.

दोन ते अडीच हजारांची उपस्थितीसर्किट बेंचच्या उद्घाटनासाठी सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकील, लोकप्रतिनिधी, विधी महाविद्यालयांचे विद्यार्थी, पक्षकार आणि कोल्हापूरची जनता उपस्थित राहणार आहे. सुमारे दोन ते अडीच हजार जण समारंभाला उपस्थित राहतील. त्यानुसार नियोजन सुरू असल्याचे वकिलांनी सांगितले. पोलिसांकडून वाहतूक, पार्किंग, प्रवेश पास, सुरक्षेचे नियोजन केले जाणार आहे.