शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा बँकेसमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 18:39 IST

BankingSector, Kolhapurnews अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामावर ताण येत असल्याने कर्मचारी भरती करावी, अशी सातत्याने मागणी करूनदेखील व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष होत असल्याने वैतागलेल्या बँक ऑफ इंडियातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी बँकेच्या दारात ठिय्या आंदोलन करून रोष व्यक्त केला. दुपारी दोनपर्यंत चाललेल्या या आंदोलनात पुढील महिन्यांत दोन दिवसांच्या लाक्षणिक संपाचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देकर्मचारी भरतीसाठी आंदोलन पुढील महिन्यात दोनदिवसीय संपाचा इशारा

कोल्हापूर : अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामावर ताण येत असल्याने कर्मचारी भरती करावी, अशी सातत्याने मागणी करूनदेखील व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष होत असल्याने वैतागलेल्या बँक ऑफ इंडियातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी बँकेच्या दारात ठिय्या आंदोलन करून रोष व्यक्त केला. दुपारी दोनपर्यंत चाललेल्या या आंदोलनात पुढील महिन्यांत दोन दिवसांच्या लाक्षणिक संपाचा निर्णय घेण्यात आला.बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन, पुणेच्या कोल्हापूर युनिटतर्फे हे आंदोलन झाले. कर्मचारी भरतीच्या मागणीसाठी गेल्या महिन्यात एकदिवसीय संप बँकेसमोर निदर्शने करीत ठिय्या आंदोलन केले. यात सुहास शिंदे, विकास देसाई, संजय देशपांडे, दीपक महेकर, पांडुरंग काईंगडे यांच्यासह सांगली, साताऱ्यातील कर्मचारी प्रतिनिधी सहभागी झाले होते.यावेळी युनियनच्या शिष्टमंडळाने बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर हेमंत खेर यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली व वरिष्ठ स्तरावर लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या भावना कळवाव्यात, अशी विनंतीही केली. यात बँकेत शिपाई व सुरक्षारक्षकांची कमतरता आहे.

खासगी सुरक्षारक्षक पुरविणारे जास्त बिल लावतात; त्यामुळे लष्करी सेवेतून निवृत्त झालेल्यांनाच बँकेत सुरक्षारक्षक म्हणून ड्यूटीवर घ्यावे अशी युनियनची मागणी आहे. याशिवाय शिपायांची संख्या खूपच कमी असल्याने कामावर ताण येत आहे. सर्व श्रेण्यांतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कामाचा बोजा वाढत चालला आहे. कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम करूनही मॅनेजमेंटची स्टाफशी वर्तणूकही अजिबात चांगली नाही. त्यांना सूचना द्याव्यात, अशा मागण्यांचा समावेश होता. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर