शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कोल्हापुरातील बांगडी बहाद्दर पैलवान पी.जी. पाटील यांचे निधन

By विश्वास पाटील | Updated: December 19, 2024 15:16 IST

कोल्हापूर : कुस्तीतील बांगडी डावाने प्रसिद्ध असणारे बांगडी बहाद्दर पैलवान आणि अनेक राष्ट्रीय पातळीवरील मल्ल घडविणारे ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक ...

कोल्हापूर : कुस्तीतील बांगडी डावाने प्रसिद्ध असणारे बांगडी बहाद्दर पैलवान आणि अनेक राष्ट्रीय पातळीवरील मल्ल घडविणारे ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक पांडुरंग गोविंद तथा पी.जी पाटील (वय वर्ष 83 रा. पाटाकडील तालीम, मंगळवार पेठ कोल्हापूर) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे, भाऊ-बहीण असा परिवार आहे.विद्यार्थी दशेत असताना पी.जी सरांनी पतियळा येथील स्पर्धेत पदक मिळवले होते. बरीच वर्षे विद्यापीठ चॅम्पियन असणारे पी.जी पाटील मोतीबाग तालीम येथे सराव करीत होते. त्यांनी महान भारत केसरी पै दादू चौगुले, कुस्ती सम्राट पैलवान युवराज पाटील हिंदकेसरी चंभा मुतनाळ राष्ट्रकुल पदक विजेते राम सारंग संभाजी पाटील याआंतरराष्ट्रीय मल्लांसह महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर गुलाब बर्डे, सरदार कुशल विष्णू फडतरे बाळू पाटील, अग्नेल व जिजो निग्रो हिंदकेसरी विनोद चौगुले यांच्यासह आता सराव करणाऱ्या बहुतांशी मल्लांना प्रशिक्षण देऊन घडविले आहे.विशेषतः कुस्ती सम्राट युवराज पाटील यांना आखाड्यातील सरावाबरोबरच क्रीडांगणावरही धावणे व इतर ऍथलेटिक्स व जिम्नेशियम करण्याचे प्रशिक्षण त्यांनी दिले होते. सदैव क्रीडांगण आणि आखाड्यात असणारे पी.जी पाटील गेल्या दीड वर्षात घरीच होते. पण अनेक मल्ल त्यांना घरी भेटून त्यांचे मार्गदर्शन घेत होतेकोल्हापूर जिल्हा परिषदेत ते लिपिक होते. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेबरोबर पाटाकडील तालमीचे कार्याध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सचिव व प्रशिक्षक अशा अनेक संघटनात्मक पदावर त्यांनी  काम केले. प्रसिद्धीपासून अलिप्त राहून कुस्ती  कलेची सेवा करणारे एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWrestlingकुस्ती