शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील गूळ रोखा अन्यथा गाड्या फोडू, शेतकऱ्यांचा समिती प्रशासनाला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 18:03 IST

कर्नाटकातील साखरमिश्रीत गुळावर ‘कोल्हापुरी गुळाचा शिक्का मारून राजरोस विक्री होत असल्याने खरा कोल्हापुरी गुळाची बदनामी होऊन दरात मारले जाते. याबाबत समिती काही निर्बंध घालणार की नाही, कर्नाटकातील गूळ रोखा अन्यथा कोल्हापुरात येणाऱ्या गुळाच्या गाड्या फोडू,’ असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

ठळक मुद्देकर्नाटकातील गूळ रोखा अन्यथा गाड्या फोडू, शेतकऱ्यांचा समिती प्रशासनाला इशारासाखरेप्रमाणे गुळाचा दर निश्चित करण्याचा बैठकीत ठराव

कोल्हापूर : कर्नाटकातील साखरमिश्रीत गुळावर ‘कोल्हापुरी गुळाचा शिक्का मारून राजरोस विक्री होत असल्याने खरा कोल्हापुरी गुळाची बदनामी होऊन दरात मारले जाते. याबाबत समिती काही निर्बंध घालणार की नाही, कर्नाटकातील गूळ रोखा अन्यथा कोल्हापुरात येणाऱ्या गुळाच्या गाड्या फोडू,’ असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.गूळ हंगामाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीने गूळ उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांची शुक्रवारी बैठक आयोजित केली होती. गूळ संशोधन केंद्राचे अधिकारी गुळातील घटक आणि वाढलेल्या साखरेच्या प्रमाणाबाबत माहिती देत होते.त्यात हस्तक्षेप करत ‘रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाटगे म्हणाले, आम्ही गुळात साखर मिसळत नाही. कर्नाटकातील साखरमिश्रीत गूळ येथील व्यापारी खरेदी करतात, त्यावर ‘कोल्हापुरी गुळाची मोहर लावून विक्री करत असल्याने खऱ्या कोल्हापुरी गुळाला मार बसतो. कर्नाटकातील गूळ रोखा अन्यथा त्या गाड्या फोडू.

यावर, कर्नाटकातील गुळाचा दर कोल्हापुरी गुळाच्या दराशेजारीही येऊ शकत नसल्याचे व्यापारी विक्रम खाडे यांनी सांगितले. यामध्ये हस्तक्षेप करत आम्ही व्यापारी आहोत, कर्नाटकातील गूळ घेऊ नका, असे तुम्ही सांगू नये. कर्नाटकचा गूळ येथे येणारच, असे नंदकुमार वळंजू यांनी ठणकावले.

राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी गुळाबाबत घेतलेल्या बैठकीचे काय झाले? अशी विचारणा करत साखरेचा दर २९ रुपये प्रतिकिलो निश्चित केला त्या प्रमाणाने गुळाचा दर ४० रुपये निश्चित करावा, असा ठराव रंगराव वरपे (साबळेवाडी) यांनी मांडला.

अन्न, औषध प्रशासन विभागानुसार गुळातील ‘सल्फर’चे प्रमाण ७० पीपीएम असण्याची सक्ती आहे. हे प्रमाण पन्नास वर्षांपूर्वीचे असल्याने त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी समिती पुढाकार घेण्याची मागणी विक्रम खाडे यांनी केली. शिवाजी पाटील-कोपार्डेकर, अमर पाटील, भगवान काटे यांनी चर्चेत भाग घेतला.शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला गूळ समितीकडे पाठवून व हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन सभापती कृष्णात पाटील यांनी केले. उपसभापती अमित कांबळे यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूर