शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: इचलकरंजीत मांसाहारी पदार्थ उघड्यावर विक्रीस बंदी, भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:53 IST

इचलकरंजी : भटक्या कुत्र्यांचा नागरिकांवर होत असलेला उपद्रव रोखण्यासाठी उघड्यावर विक्री करण्यात येत असलेल्या मांसाहारी खाद्य पदार्थ विक्रीवर महानगरपालिकेने ...

इचलकरंजी : भटक्या कुत्र्यांचा नागरिकांवर होत असलेला उपद्रव रोखण्यासाठी उघड्यावर विक्री करण्यात येत असलेल्या मांसाहारी खाद्य पदार्थ विक्रीवर महानगरपालिकेने बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरातील मांसाहारी खाद्य पदार्थ विक्रीचे हातगाडे बंद ठेवण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिला आहे.भटक्या कुत्र्यांचा उच्छाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आठ दिवसांत दोन वेळा लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्यांकडून होत असलेल्या हल्ल्यानंतर समाज माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, तसेच दोन दिवसांपूर्वी विविध राजकीय पक्ष, संघटनांनी आंदोलन करीत भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली होती. निर्बिजीकरण मोहिमेत हायगय केल्याबद्दल आरोग्य अधिकाऱ्यांसह दोघांना कारणे दाखवा नोटीस अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी बजावली होती. शहरात उघड्यावर मांसाहारी पदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यांची संख्या वाढली आहे. या गाड्यावरील टाकाऊ पदार्थ उघड्यावर टाकण्यात येत असल्याने कुत्र्यांची संख्या वाढत असून कुत्रीही हिंस्र बनत असल्याच्या तक्रारी नगरपालिकेकडे प्राप्त होत होत्या. त्यामुळे शहरात सायंकाळनंतर उघड्यावर विक्री करण्यात येत असलेल्या मांसाहारी खाद्य पदार्थ विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

आयुक्त पाटील यांनी अतिक्रमण विभागाला तोंडी आदेश दिले. त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकाने मांसाहार खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या न लावण्याच्या सक्त सूचना हातगाडी मालकांना दिल्या होत्या. त्यामुळे शहरातील डेक्कन चौक, शाहू पुतळा येथून येणारा मुख्य मार्ग यावरील गाड्या बंद असल्याचे निदर्शनास आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीdogकुत्रा