शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

Kolhapur: माणगावमध्ये डॉल्बी, फटाके, डिजीटल फलक लावण्यास बंदी, विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायतीने घेतला निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 16:50 IST

नियमावलीचे उल्लघंन केल्यास दंड 

अभय व्हनवाडे रूकडी/माणगाव: माणगाव ता.हातकणगंले येथे रविवार (दि.१२ मे) रोजी मोबाइलवरील स्टेटसवरुन दोन समाजात झालेल्या तणाव निर्माण झाला होता. यानंतर गावात सामाजिक सलोखा टिकावा यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलवून गावामध्ये डॉल्बी, चौकात डिजिटल फलक लावणे, सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस निमित्त फटाके वाजविणे यावर बंदी घातली आहे. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून याची कडक अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली.माणगावमध्ये विविध धार्मिय महापुरुषांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. जयंती दिनी युवक दुचाकी वाहनांच्या पुंगळ्या काढून गावभर फिरतात. यावरुन प्रसंगी वादावादीचे प्रसंग घडतात. यामुळे सामाजिक व धार्मिक तणाव वाढत आहे. सामाजिक सलोखा टिकावा याकरिता ग्रामपंचायतीने‌ आचारसंहिता बनविली आहे, ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घेत सर्वधर्मिय शांतता कमिटी स्थापन करणे. गावामध्ये धार्मिक-सामाजिक-राजकीय कार्यक्रम सह वाढदिवसानिमित्त डिजीटल फलक न लावणे, डॉल्बी न लावणे, पुंगळया काढून वाहन पळविणेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबरोबर गावातील मार्गावर वाढदिवस साजरा करणे. रात्रीचे फटाके वाजविणे, रात्रीच्या वेळी सार्वजनिक रस्त्यावर खेळ खेळण्यास ही प्रतिबंध करण्यात आला आहे. नियमावलीचे उल्लघंन केल्यास दंड नियमावलीचे उल्लघंन केल्यास संबंधितांचे खासगी नळ कनेक्शन एक वर्षासाठी बंद व  घरफाळामध्ये पाच हजार रुपयांचा दंड आकारुन वसूल करण्याचा ठराव सभेने संमत केला आहे. तसेच जातीय तणाव होईल असे स्टेटस लावणे असे मजकूर सोशल मिडियावर प्रसिद्ध केल्यास त्यांच्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने गुन्हे दाखल करण्याचा निर्णय ही ग्रामसभेने मान्य केला. ग्राामसभेत अनिल जगदाळे, नंदकुमार शिंगे यांनी हा ठराव मांडला त्यास अनिल  पाटील, दादासो  वडर यांनी अनुमोदन दिले. ग्रामसभेचे ठरावाचे प्रत  जिल्हाधिकारी, उपविभागीय कार्यालय इचलकरंजी, तहसिलदार ऑफिस व पोलिस स्टेशन हातकणंगले यांना‌ देण्यात आली.

गावांमध्ये स्टेटसवरून निर्माण झालेला जातीय तेढ अशोभनीय असून सामाजिक शांतता व सलोखा टिकावे याकरिता ग्रामसभेत झालेल्या निर्णयाचे कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. - डॉ.राजू मगदूम, सरपंच माणगाव

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत