शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

बांबूची डोली हीच ‘१०८ आरोग्य सेवा’, शाहूवाडीतील आंबाईवाड्याची अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:53 IST

आर. एस. लाड ।आंबा : अभयारण्यातील हिंस्र प्राण्यांची टांगती तलवार, डोंगर-झाडीतील पायवाट, खांद्यावरील डोलीत निपचित पडलेला रुग्ण नि जीव मुठीत धरून दहा किलोमीटरवरील दवाखान्याकडे धावणारे ग्रामस्थ हे विदारक चित्र आहे आंबाई व उखळू धनगरवाड्यावरचे. शाहूवाडीच्या उत्तर सीमेवरील चांदोली अभयारण्याशी बिलगून असलेला उखळूचा आंबाईवाडा स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही रस्ता व आरोग्य या सुविधेअभावी ...

ठळक मुद्देरस्त्यांअभावी जंगल वस्तीतील नागरिकांचे आरोग्य टांगणीला

आर. एस. लाड ।आंबा : अभयारण्यातील हिंस्र प्राण्यांची टांगती तलवार, डोंगर-झाडीतील पायवाट, खांद्यावरील डोलीत निपचित पडलेला रुग्ण नि जीव मुठीत धरून दहा किलोमीटरवरील दवाखान्याकडे धावणारे ग्रामस्थ हे विदारक चित्र आहे आंबाई व उखळू धनगरवाड्यावरचे. शाहूवाडीच्या उत्तर सीमेवरील चांदोली अभयारण्याशी बिलगून असलेला उखळूचा आंबाईवाडा स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही रस्ता व आरोग्य या सुविधेअभावी वनवास भोगत आहे.अभयारण्याच्या सीमेवरून या वाड्यावर दहा किलोमीटर झाडीतून थेट चढणीने सह्याद्रीच्या माथ्यावर नागमोडी पाऊलवाट पोहोचते. आंबाईच्या पुढे खोतवाडा, पाचणे वस्ती, हेळ््याचा माळ व वरचा धनगरवाडा या चार वस्त्यांतील सव्वाशे उंबरा एक किलोमीटरवरील कड्यालगत वसला आहे. धनगर व कुणबी समाज तीन पिढ्यांपासून येथे राहतो. रस्ता नाही म्हणून अन्य सुविधांची येथे वानवा आहे. वीज दोन वर्षांपूर्वी पोहोचली. रस्ता हे येथील दिवास्वप्नच आहे. येथे रुग्ण किंवा बाळंतीण मातेच्या पाचवीलाच सुविधेची वानवा पुजलेली आहे. चिव्याने विणलेल्या डोलीत घोंगडे पसरून रुग्णाला बसविले जाते. डोलीत दोन्ही बाजूला बांबू घालून चौघेजण डोली खांद्यावर घेऊन रुग्णाला सीमेवरील आरळा-चरणात धाव घेतात. गेल्या तीन पिढ्यांतील वास्तवचित्र बदलणार केव्हा? असा प्रश्न येथील उपसरपंच दीपक गावडे व नथुराम खोत यांनी केला.सर्वत्र १०८ च्या सुविधेचा बोलबाला असताना या वस्तीवरील डोली खांद्यावर घेऊन धावणारे ग्रामस्थ सुविधांचा सूर्य उगवण्याची वाट पाहत आहेत. येथील घनघोर पावसाळा तर या वनवासी मंडळींची झोप उडवतो. घसरगुंडी करीतच पाठीवर रुग्ण घेऊन धोकादायक पायपीट नशिबी असल्याची व्यथा शामराव बकरे व ठकाबाई गावडेयांनी मांडली. कोल्हापूर, सांगलीव सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरीलहा अभयारण्याचा भाग सह्याद्रीव्याघ्र प्रकल्प म्हणून विकसितहोत आहे. यामुळे त्यांच्या उपजीविकेच्या साधनावर निर्बंध आले आहेत.जीवघेणा प्रसंगपाजणे वस्तीतील बयाबाई पाजणे यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना डोलीत घालून आणताना चार किलोमीटरचे जंगल उतरून येताच वाटेतच प्रसूती झाल्याचा जीवघेणा प्रसंग येथील सुईन सोनाबाई विठू झोरे यांच्या मनावर कोरल्याची आठवण त्यांनी सांगितली. अशा जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जाऊन अनुभव घेणारा, तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगेत वस्ती करून राहिलेला धनगर समाज नवा नाही. रस्त्यांअभावी पावसाळ्यात निळेपैकी पिंगळेवाडा, पुसार्ळे धनगरवाडा, राघूचा वाडा, विशाळगड येथे रुग्णांना डोलीत बसवून दवाखान्यात नेणारी व्यवस्था स्थानिकांनी उभारली आहे.