शहरं
Join us  
Trending Stories
1
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
2
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
3
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
4
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
5
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
6
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
7
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
8
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली
9
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा परवाना रद्द; ३०० वेळा उल्लंघन करणाऱ्या कंपनीला ठोकलं टाळं
10
म्हणून त्याला किंग खान म्हणतात! 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीला ड्रेसमुळे चालताच येईना, शाहरुखची 'ती' कृती प्रेक्षकांना भावली
11
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
12
मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका, न्यायमूर्तींनी दिला मोठा निर्णय, सुप्रिम कोर्टात काय घडलं?
13
टाटा-इन्फोसिससह 'हे' शेअर्स आपटले; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा लाल रंगात; 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
14
चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण...
15
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
16
DSP सिराज नंबर वन! झिम्बाब्वेच्या गड्याला टाकले मागे; पण इथं टॉप ५ मध्ये दिसत नाही बुमराहचं नाव
17
मजुराला रस्त्याच्या कडेला सापडला एक दगड, घरी नेल्यावर कळलं की...; क्षणात आयुष्य बदलले!
18
Shani Gochar 2025: शनि देवाची खास दिवाळी भेट: २० ऑक्टोबरपासून 'या' ८ राशींच्या तिजोरीत होणार धनवृद्धी!
19
दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास
20
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?

बेडगमध्ये रंगला बालसाहित्यिकांचा मेळा!

By admin | Updated: January 10, 2015 00:19 IST

विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती : ग्रंथदिंडी, कथाकथन, मुलाखतीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रवीण जगताप - लिंगनूर समाज उभारणीचे सर्जनात्मक कार्य लेखणीतून घडते. परिसरातील घटनांकडे संवेदनशीलतेने पाहिल्यास कविता जन्माला येते. गरिबी, दुष्काळ, अंधश्रद्धा या समस्यांचे व समाजमनाचे प्रतिबिंब साहित्यात का उमटू शकत नाही, या भावनेने प्रेरित होऊन त्याचे उत्तर शोधताना सामान्य माणूस लेखणीतून साहित्यात आला, असे प्रतिपादन सुरसगाव (जि. जळगाव) येथील ज्येष्ठ कवी अशोक कौतिक कोळी यांनी केले.बेडग (ता. मिरज) येथे आयोजित मिरज तालुक्याच्या दुसऱ्या विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्रात बालमुलाखतकार शिवानी चौगुले (सोनी), सीमरन जमादार (मौजे डिग्रज), सिराज मुजावर यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी कोळी यांनी भावविश्व उलगडले.संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी व पालखी सोहळ्याने झाली. लेझीम, टाळ, टिपऱ्या, वारकरी वेशभूषा, दिंडी नृत्य, सांस्कृतिक वेशभूषा, पारंपरिक वेशभूषा, झांज, फुगडी व विविध सांस्कृतिक नृत्य व खेळांचे प्रकार ग्रंथदिंडीची शोभा वाढवित होते. गावात मुख्य पेठेतील रस्त्याच्या बाजूने रांगोळ्या काढल्या होत्या. ग्रंथदिंडी साहित्यनगरीत येताच सभामंडपात बालरसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यानंतर सभापती दिलीप बुरसे, शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे, गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे, कवी अशोक कोळी, संमेलनाध्यक्षा गायत्री पाटील, अ‍ॅड. के. डी. शिंदे यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. स्वागताध्यक्ष वेदांत शहा याने स्वागत केले. संमेलनाध्यक्षा गायत्री पाटील म्हणाली की, या साहित्य संमेलनातून लेखनकलेस प्रोत्साहन व दिशा मिळाली व कथा-कवितांच्या छंदाचे वास्तवात रूपांतर झाले. सकाळच्या सत्रात कवी कोळी यांची विविधांगी प्रश्नांसह प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी कोळी यांनी ‘चिमण्यांनो धीर धरा’ ही कविताही सादर केली. त्यानंतर कथाकथन सत्राचा अध्यक्ष हर्षवर्धन कांबळे याच्या उपस्थितीत कथाकथन पार पडले. दुपारच्या सत्रात काव्यसंमेलनाध्यक्ष सुमित माळी याच्या अध्यक्षतेखाली बालकवींनी काव्यरचना सादर केल्या. सूत्रसंचालन वैष्णवी जाधव, भक्ती कदम, प्रतीक बिसुरे, निकिता चव्हाण यांनी केले.उपसभापती तृप्ती पाटील, सरपंच सुमनताई खरात, ििकरण गायकवाड, हरिभाऊ गावडे, पृथ्वीराज पाटील, अमर पाटील, साहित्यिक फारूक काझी, दयासागर बन्ने, संमेलनाचे प्रवर्तक गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी, पं. स. सदस्या राणी देवकारे, जयश्री कबुरे उपस्थित होते. संमेलनप्रमुख विस्तार अधिकारी गणेश भांबुरे, उल्हास सानप, विजय नागरगोजे, महादेव वनवे, रवींद्र केंचे, बाळासाहेब लिंबीकाई, विष्णू ओमासे यांनी संयोजन केले.कोणती कविता लाडकी ?कवी अशोक कोळी यांच्या मुलाखतीत, तुम्हाला सर्वात आवडती कविता कोणती? असा प्रश्न विचारला, तेव्हा ते म्हणाले, जसे आई-वडिलांना आपली सारीच मुले प्रिय असतात, तसे लेखणीतून उतरलेल्या साऱ्याच कविता कवीला प्रिय असतात..काव्यसंमेलनात एका बालकवीच्या ‘थंडी रे थंडी, डोक्यावर उभी राहिली केसाची शेंडी, थंडी रे थंडी, कोंबडीच्या पिलाने दिली झटक्यात बारा अंडी’ या विनोदी रचनेने रसिकांची दाद मिळविली.ग्रंथदिंडीत केंद्रप्रमुख, शिक्षक, शिक्षिका यांनी दिंडीनृत्य, फुगडी खेळून, नाचून सहभाग घेतला, तर पंचायत समितीचे सभापती दिलीप बुरसे व सदस्य शंकर पाटील यांनी झांज खेळून ग्रंथदिंडीत सहभाग नोंदविला. लेझीम नृत्याने, विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कलाकुसरींनी, तसेच विविध वेशभूषेतील बालकलाकारांनी प्रेक्षकांची गर्दी खेचली.