शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले सामानगडची बलभीम यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 18:02 IST

Religious Places SamangadFort Kolhapur : किल्ले सामानगडावरील बलभीम देवाची १२ ते १५ मार्चअखेर होणारी सात गावांची यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार दिनेश पारगे यांनी दिली.

ठळक मुद्देकिल्ले सामानगडची बलभीम यात्रा रद्द धार्मिक विधीस परवानगी : पालख्यादेखील वाहनातूनच येणार

गडहिंग्लज : किल्ले सामानगडावरील बलभीम देवाची १२ ते १५ मार्चअखेर होणारी सात गावांची यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार दिनेश पारगे यांनी दिली.

दरवर्षी, महाशिवरात्री नंतर ही यात्रा होते.यात्रेच्या आदल्या दिवशी सामानगडावर चिंचेवाडी, नौकूड, नूल, तनवडी, मुगळी, जरळी व भडगाव या गावातील ग्रामदेवतांच्या पालख्यांची भेट होते. दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो.परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली आहे.त्यामुळे केवळ मोजक्या मानकर्‍यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी साधेपणाने पार पाडले जाणार आहेत.दरवर्षी सात गावातून येणार्‍या पालख्या व त्यांच्या भेटीचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गडावर येतात.परंतु, यावर्षी पालख्या वाहनातून गडावर येणार आहेत. प्रत्येक गावातील पालखीसोबत ६, धार्मिक विधीसाठी ५ आणि इतर ४ व्यक्ती अशा १५ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतरासह सर्व नियमावलींचे संबंधितांनी काटेकोर पालन करावे. तसेच भाविकांनी यात्रा काळात दर्शनासाठी मंदीर परिसरात येवू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Fortगडcorona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरReligious Placesधार्मिक स्थळे