शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

शिल्लक : एस.टी.प्रमाणे के.एम.टी.लाही बूस्टरची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:17 IST

कोल्हापूर : एस. टी.प्रमाणे के.एम.टी.चीही अर्थिक स्थिती बेताची आहे. येथील कर्मचाऱ्यांची गेल्या सहा महिन्यांपासून २५ टक्के पगारकपात सुरू आहे. ...

कोल्हापूर : एस. टी.प्रमाणे के.एम.टी.चीही अर्थिक स्थिती बेताची आहे. येथील कर्मचाऱ्यांची गेल्या सहा महिन्यांपासून २५ टक्के पगारकपात सुरू आहे. ज्याप्रमाणे एस.टी.ला एक हजार कोटींचे साहाय्य देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणेच तोट्यात असणाऱ्या के.एम.टी.लाही राज्य सरकारकडून बूस्टरची गरज आहे. एस.टी.ला एक हजार कोटी दिले, के.एम.टी.ला किमान १० कोटी तरी द्या, अशी मागणी जोर धरत आहे.

एस.टी.प्रमाणे राज्यातील ११ महापालिका सार्वजनिक वाहतुकीच्या सेवा देत आहेत. त्यांनाही काेरोनाचा फटका बसला आहे. त्यामध्ये कोल्हापूर महापालिकेच्या के.एम.टी.चाही समावेश आहे. लॉकडाऊनमध्ये बससेवा बंद राहिली. सध्या सेवा सुरू असली तरी अपेक्षित प्रवासी नाहीत. अद्यापही १०० पैकी ६७ बसेस वर्कशॉपमध्ये लावून आहेत. के.एम.टी.चा सध्या रोज १० लाखांचा तोटा होत आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

चौकट

नेत्यांनी जोर लावल्यास शक्य

शासनाच्या अंतर्गत एस. टी. महामंडळ असल्यामुळे या खात्याला अर्थसाहाय्य देणे क्रमप्राप्त आहे; परंतु केएमटीही ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर सेवा देत आहे. महापालिकेवर गेली १० वर्षे महाविकास आघाडीची सत्ता होती. विशेष म्हणजे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे परिवहन खाते आहे. त्यांनी जोर लावला तर के.एम.टी.ला विशेष बाब म्हणून अर्थसाहाय्य मिळणे कठीण नाही.

चौक़ट

हक्काचे साडेतीन कोटी तरी द्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सेवेत २५ के.एम.टी. बसेस होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या मोबदल्यात के.एम.टी.ला चार कोटींचे देणे बाकी आहे. वारंवार मागणी केल्यानंतर केवळ ५० लाख दिले. हक्काचे साडेतीन कोटी तरी प्रशासनाने के.एम.टी.ला द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चौकट

के.एम.टी.चा रोजचा तोटा : १० लाख

रोजचे उत्पन्न : २ लाख

एकूण कर्मचारी : ६७०

महिन्याला कर्मचारी पगारावर खर्च : १ कोटी ६५ लाख

२५ टक्के कपातीमुळे थकीत पगार : १ कोटी ७० लाख