शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील गारगोटीच्या मिल्खासिंगची परिस्थितीशी जीवघेणी शर्यत, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत; मदतीची गरज  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 12:17 IST

हरयाणा, बंगळुरू, मंगलोर, नाशिक, पांजा, उत्तर प्रदेश, दिल्ली, नाशिक, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळवली

कोल्हापूर : खेडूत (ता. भूदरगड) येथील बजरंग महादेव चव्हाण हे धावपटू आर्थिक दुर्बलता आणि अशिक्षितपणामुळे मजूर बनले आहेत. तीस सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक मिळवणाऱ्या या राष्ट्रीय खेळाडूची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे.

वयाच्या ६७ व्या वर्षी सतत धावणारा हे महाराष्ट्राचा मिल्खासिंग एवढी पदके जिंकूनही गवंड्याच्या हाताखाली काम करतात. शेतमजूर म्हणून घाम गाळतात. ते पाखरासारखे पळतात. म्हणून त्यांना पाखऱ्या या टोपण नावाने तालुका ओळखतो. तरीही त्यांना मदत करण्यासाठी लोकप्रतिनिधी, जबाबदार अधिकाऱ्यांकडे वेळ नसल्याचे चित्र आहे.आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याची इच्छा असून, पैसे, शिक्षण नसल्याने चव्हाण वंचित राहिले. स्पर्धेमध्ये भाग घेतानाही त्यांना असंख्य अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यांच्याकडे कुत्सीत नजरेने पाहून काही स्पर्धेच्या ठिकाणी त्यांना बाजूलाही करण्यात आले आहे; पण त्यांनी जिद्द सोडली नाही. हरयाणा, बंगळुरू, मंगलोर, नाशिक, पांजा, उत्तर प्रदेश, दिल्ली, नाशिक, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळवली आहे.विविध ठिकाणच्या दहा स्पर्धांमध्ये ते चमकले आहेत. त्यांनी खरगपूर येथे झालेल्या ४२ व्या नॅशनल मास्टर्स ॲथलेट चॅम्पियनशिप स्पर्धेत चव्हाण ८०० मीटरमध्ये आणि पंधराशे मीटर धावण्यात पहिला क्रमांक तर ४०० मीटरमध्ये दुसरा क्रमांक, ५००० मीटर मध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. गरिबी असली तरी आपल्या गावातली मुले लष्करामध्ये दाखल व्हावीत, यासाठी त्यांना मोफत धावण्याचे प्रशिक्षण ते देतात.

ये हमारा वाडेका बूट हैचव्हाण यांनी पंजाबला जेव्हा स्पर्धा जिंकली, त्यावेळेला त्याला पंजाबी खेळाडूने विचारले, तू कोणते बूट घातले होते ? त्यावेळेला मोडक्या हिंदी भाषेमध्ये ते म्हणाले ‘ये हमारा वाडेका बूट है’ त्या पंजाबीला समजेना हे कोणत्या कंपनीचे बूट आहेत. त्यावेळी दुसऱ्या महाराष्ट्रीयन माणसाने समजून सांगितले. खेड्यामध्ये उसाच्या पाल्याला वाडे म्हणतात, ते कापून जनावरांना आणण्यासाठी जे बूट वापरतो तेच हे बूट आहेत. हे ऐकल्यावर पंजाबमधल्या त्या दिलदार खेळाडूने त्यांच्यासाठी एक चांगले बूट विकत आणून भेट दिले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर