शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

‘ब्याडगी,’ ‘जवारी’चा बाजारात ठसका

By admin | Updated: March 30, 2015 00:12 IST

मिरची खरेदीसाठी झुंबड : साखरेची घसरण थांबेना; भाजीपालाही स्वस्त

कोल्हापूर : पावसाळ्यासाठी चटणी तयार करण्यासाठी गृहिणींची मिरची खरेदीसाठी बाजारात झुंबड उडाली आहे. ‘ब्याडगी’, ‘जवारी’ मिरची खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. त्याचबरोबर चटणीसाठी लागणारा मसाला व कोथिंबीर खरेदीसाठी आठवडी बाजारात गर्दी दिसत आहे. भाजीपाल्याचे दर घसरले असून, साखरेच्या दरातील घसरण थांबलेली नाही. खराब हवामानाचा फटका फळांच्या आवकेवर बसला आहे. पावसाळ्यात पुरेल एवढी चटणी एप्रिल, मे महिन्यांत अगोदरच करून ठेवली जाते. जानेवारीनंतर मिरचीची आवक वाढण्यास सुरुवात होते. सध्या बाजारात ‘ब्याडगी,’ ‘जवारी’ मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात दिसत आहे. लालभडक ‘ब्याडगी’ जिभेला चटका देत असली तरी ‘जवारी’ मिरचीत ती मिसळली जातेच. हैदराबाद, कर्नाटकमधून सध्या मिरचीची आवक सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीचे उत्पादन चांगले झाल्याने आवकही भरपूर आहे. गेल्या वर्षीपेक्षा किलोमागे २० रुपये मिरचीचे दर घसरलेले आहेत. ‘ब्याडगी’चा दर प्रतिकिलो १३०, तर ‘जवारी’चा १०० रुपये आहे. चटणीसाठी लागणारी कोथिंबीर, आले, जिरे, तीळ, खोबरे, धने खरेदीसाठीही गर्दी दिसत आहे. तूरडाळीच्या दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ झाली आहे. सरकी तेलाच्या दरात दोन रुपयांनी घसरण झाली आहे. हरभराडाळ, शाबूदाणा, खोबरे, तीळ, जिऱ्याचे दर स्थिर आहेत. साखरेचे दर घसरू लागले आहेत. किरकोळ बाजारात बारीक साखर २६ रुपयांपर्यंत आली आहे. गेल्या आठवड्यात साठा करून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना घसरणीचा झटका बसला आहे. स्थानिक भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने दर निम्म्यावर आले आहेत. कोबी, वांगी, टोमॅटो, ढब्बू, गवार, भेंडीचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्म्यावर आले आहेत. काकडीची आवक वाढली असून, घाऊक बाजारात प्रतिकिलो १० रुपये दर राहिला आहे. कोथिंबिरीची आवक चांगली असून, किरकोळ बाजारात ५ रुपये असा पेंढीचा दर आहे. दर आठवड्यात येणारा पाऊस, खराब हवामान यांमुळे यंदा फळबागा संकटात सापडल्या आहेत. द्राक्षे, कलिंगडाचे पीक धोक्यात आले असून, त्याचा आवकेवर परिणाम झाला आहे. द्राक्षांची आवक जरी होत असली तरी त्यांची गोडी व तजेलदारपणा कमी झाला आहे. रत्नागिरी, देवगड आंब्यांची आवक सुरू आहे. हापूसला पावसाचा फटका बसला असून त्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. येत्या आठ दिवसांत मद्रास व बंगलोर हापूसची आवक सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)ऊस जाऊन दोन महिने झाले तरी शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून बिले मिळालेली नाहीत. त्यात मार्चअखेर असल्याने ग्राहकांचा खिसा रिकामा आहे. त्यामुळे आर्थिक उलाढाली काहीअंशी मंदावल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. बटाटा घसरलाबटाट्याची आवक स्थिर असूनही दरात कमालीची घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात १५ रुपये किलो बटाटा, तर २० रुपये किलो कांदा झाला आहे.