शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या एसपींचा डीजे मालकांना सज्जड इशारा; म्हणाले..

By उद्धव गोडसे | Updated: August 16, 2023 18:43 IST

कोल्हापूर : दहीहंडी आणि गणेशोत्सवात सर्व मंडळे, ध्वनी यंत्रणांचे मालक, चालक आणि मंडळांनी लेसरचा वापर टाळावा. आवाज मर्यादेचेही काटेकोर ...

कोल्हापूर : दहीहंडी आणि गणेशोत्सवात सर्व मंडळे, ध्वनी यंत्रणांचे मालक, चालक आणि मंडळांनी लेसरचा वापर टाळावा. आवाज मर्यादेचेही काटेकोर पालन करावे, अन्यथा सर्व यंत्रणा जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करणार, असा इशारा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिला. बुधवारी (दि. १६) अलंकार हॉलमध्ये ध्वनी यंत्रणा मालक, चालकांसोबत झालेल्या बैठकीत अधीक्षक पंडित बोलत होते. एक दिवस तुमचा असेल, पण ३६४ दिवस आमचे असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.नियमांचे उल्लंघन केल्यास ध्वनी यंत्रणा, लेसर, स्ट्रक्चरवर जप्तीची कारवाई होणार आहे. न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास दोषींना पाच वर्षांपर्यंत कारावास आणि पाच ते सहा लाखांचा दंड होऊ शकतो, अशी माहिती पोलिसांनी दिली. आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने जिल्ह्यातील ध्वनी यंत्रणा चालक, मालक, जनरेटरधारक, वाहनधारकांची बैठक झाली. या बैठकीत पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रमोद माने यांनी मोठ्या आवाजाच्या ध्वनी यंत्रणांचे धोके स्पष्ट केले. शहर पोलिस अधीक्षक अजित टिके यांनी मंडळे, वाहनधारक, ध्वनी यंत्रणा चालक, मालक, स्ट्रक्चरवाले यांच्यासाठी नियमावली जाहीर केली. प्रबोधन करूनही नियमांचे उल्लंघन झाल्यास दोषींवर कारवाई अटळ असल्याचे त्यांनी सांगितले.ध्वनी यंत्रणांचे चालक आणि मालकांच्या अपेक्षा जाणून घेतल्यानंतर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलिस प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. ‘ध्वनी यंत्रणांचे मालक मंडळांकडून भाडे घेत असले, तरी ते कायद्याला बांधिल आहेत. परवानगीपासून ते आवाज मर्यादेपर्यंत सर्वप्रकारची खबरदारी त्यांना घ्यावी लागेल. अन्यथा सर्व यंत्रणा जप्त करून मंडळांसह ध्वनी यंत्रणा मालक, चालक, वाहनधारक अशा सर्वांवर गुन्हे दाखल होतील.’

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanesh Mahotsavगणेशोत्सवPoliceपोलिस