शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

नगरसेविकेच्या पतीला जागा देण्याचा ठराव मागे

By admin | Updated: April 25, 2015 00:47 IST

‘राजाराम’च्या बगीचा आरक्षणाचा ठरावही मागे

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसर विकास प्रकल्पाच्या नव्याने केलेल्या २५५ कोटींच्या प्रारूप आराखड्यास महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सभेत मंजुरी देण्यात आली. राजेंद्रनगर परिसरातील क्रीडांगण व शाळेसाठी आरक्षित असलेली जागा (रि.स.नं. ५४१ पै) नगरसेविका जयश्री साबळे यांचे पती राजेंद्र साबळे यांच्या शिक्षण सोसायटीला भुईभाड्याने देण्याचा ठराव परिसरातील नागरिक व नरगसेवक भूपाल शेटे यांच्या तक्रारीनंतर सभेत येण्यापूर्वीच प्रशासनाने मागे घेतला. तसेच राजोपाध्येनगर येथील शाळेस गोविंद पानसरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. २५५ कोटी रुपये खर्चून अंबाबाई मंदिराचा विकास तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. या दृष्टीने तयार केलेला आराखडा सभेच्या मंजुरीमुळे आता राज्य शासनास पाठविला जाणार आहे. राजाराम कारखान्याच्या जागेवर बगीचा आरक्षण टाकण्याचा ठराव मागे घेण्यात आला. येथील रि.स.नं. ३७३/ब येथील हिरव्या पट्ट्यातील असणारी जागा बगीचा आरक्षित न ठेवता, उलपे मळा येथे जाण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूची जागा संपादित करून रस्ता करण्याचे ठरले. पदवीधर कर्मचाऱ्यांना जादा वेतनवाढ देण्याबरोबरच इतर कर्मचाऱ्यांचेही नुकसान करू नका, अशी उपसूचना देत, वेतनवाढीचा मुद्दा सभागृहाने मान्य केला. प्राथमिक शाळेचे आरक्षण असलेल्या रि.स.नं. १७५/१अ पैकी ८७६ चौरस मीटर जागा खरेदी सूचना देणे, ई वॉर्डातील रि.स.नं. ५४६ येथील खुल्या जागेचे हिरव्या पट्ट्यातून रहिवाशी जागेत बदल करणे, स्टर्लिंग टॉवर ते बागल चौकापर्यंत १२ मीटर रस्त्यासाठी भूसंपादन करणे, आदी आरक्षणाचे इतर सर्व विषय पुढील सभेपर्यंत राखून ठेवण्याचा निर्णय घेतला.