शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयात बाळ दगावले, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप; नातेवाईकांचा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:36 IST

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात चार दिवसांपूर्वी जन्मलेले बाळ दगावल्याची घटना मंगळवारी पहाटे समोर आली. या घटनेमुळे संतप्त ...

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात चार दिवसांपूर्वी जन्मलेले बाळ दगावल्याची घटना मंगळवारी पहाटे समोर आली. या घटनेमुळे संतप्त नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा आरोप करत सुमारे चार तास रुग्णालयात गोंधळ घातला. काही कार्यकर्ते डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचा तसेच चौकशी समिती नेमून दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याचा निर्णय झाल्यानंतर मृत बाळ नातेवाईकांनी ताब्यात घेतले.मूळच्या संगमनेर तालुक्यातील पिंपळगांव येथील व सध्या कोल्हापुरातील माळी गल्ली येथे वास्तव्यास असलेल्या सान्वी सूरज गावडे (वय २४) यांनी गरोदर राहिल्यानंतर सावित्रीबाई फुले रुग्णालयात नोंदणी केली. शनिवारी पहाटे त्यांनी मुलाला जन्म दिला. प्रसुतीवेळी थोडी अडचण आल्याने चिमटे लावून प्रसुती (व्हेंट्यूज डिलिव्हरी) करण्यात आली. खबरदारी म्हणून बाळाला बालरोग कक्षात दाखल केले. दोन तासांनी बाळाची तब्बेत ठणठणीत असल्याची खात्री केल्यानंतर आईच्या ताब्यात देण्यात आले.सोमवारी दुपारी बाळाच्या नातेवाईकांनी बाळाचे अंग पिवळे दिसत असल्याची तक्रार केली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पुढील तपासण्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून उद्या केल्या जातील, असे सांगण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी पहाटे पाच वाजून ५० मिनिटांनी त्याची हालचाल व श्वासोच्छवास बंद असल्याचे दिसून आले. त्यांनतर डॉ. पी. जी. कदम व ड्युटीवरील नर्सनी बाळाची तपासणी केली असता ते मृत झाल्याचे निदर्शनास आले.बाळाचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय रुग्णालयाने घेतला. ही बाब नातेवाईक तसेच अन्य सामाजिक कार्यकर्त्यांना समजताच सकाळी दहा वाजल्यापासून त्यांनी रुग्णालयात गर्दी केली. डॉक्टर, नर्स यांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा आराेप त्यांनी केला. आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, अधीक्षक डॉ. संजना बागडी यांनी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी काहीजण डॉक्टरांच्या अंगावर धावले. पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेऊन दोन्ही बाजूशी चर्चा केली. तक्रार असल्यास गुन्हा दाखल करा, अशी सूचना पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी केली. त्यावेळी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला.

चौकशी समिती नेमणार : पावराबाळाची तब्बेत चांगली असताना बाळ कसे दगावले, याची चौकशी करण्यासाठी बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञांची समिती स्थापन करून चौकशी केली जाईल. त्यामध्ये कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर