शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

बाप रे....नागाने गिळला विषारी घोणस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 18:59 IST

भूकेसाठी नागाने घोणस जातीच्या विषारी सापाला गिळकृत केलेली आश्चर्यकारक घटना पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथील शेतकरी शामराव नायकू चेचर यांच्या जनावराच्या गोठ्यात अनुभवायास मिळाली.

सरदार चौगुले

पोर्ले तर्फ ठाणे : बेडूक, उंदीर, सरडा, यासारखे अन्य जीव नागाचे मुख्य भक्ष्य मानले जातात. परंतू भूकेसाठी नागाने घोणस जातीच्या विषारी सापाला गिळकृत केलेली आश्चर्यकारक घटना पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथील शेतकरी शामराव नायकू चेचर यांच्या जनावराच्या गोठ्यात अनुभवायास मिळाली. जंगलांची संख्या घटू लागल्याने जैवविविधतेतील अस्तित्वाला धोका पोहचू लागला आहे. त्यामुळे अन्नाच्या शोधात वन्यप्राण्यांचा मानव वस्तीतील वाढता शिरकाव चिंताजनक आहे.पोर्लेतील चेचर शिवारातील शामराव चेचर यांच्या जनावरांच्या गोठ्यात सांयकाळी पाचच्या सुमारास उंबऱ्यावर फना काढून नाग वाटेत आडवा उभारला होता. त्याला सर्पमित्र सुरेश चेचर यांनी पकडल्यानंतर त्याने गळ ओकायला सुरूवात केली. आश्चर्याची गोष्टी म्हणजे नागाने घोणस जातीचा विषारी सापाला मारून, गिळकृत केले होते.

त्यांनतर सर्पमित्र यांनी मेलेल्या सापाची योग्य विल्हेवाट लावली, तर नागाला जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून दिले. दरम्यान केर्ले ता.करवीर येथील दगडी कारखान्यात सर्पमित्र दिनकर चौगुले यांनी नाग पकडला होता. त्या नागाने तस्कर नावाचा बिनविषारी साप गिळला होता.जैवविविधतेवर परिणाम होऊ लागल्याने अन्नसाखळीत धोकाडोगर, जंगलांना आग लावण्याचे प्रकार वाढत असल्याने जंगलातील जीवजंतू आगीत मरण पावतात अथवा जीव वाचविण्यासाठी स्थलांतरीत होतात. याचा जैवविविधतेवर परिणाम होऊन अन्नसाखळीचं धोक्यात येऊ लागली आहे. वन्यप्राण्यांना भक्ष्यचं मिळत नसल्याने प्राणीच प्राण्यांची शिकार करत. या प्रकाराला पर्यावरणाचा होत चाललेल्या ऱ्हासांच्या बाबी कारणीभूत आहे.

गाभीर्याने घेण्याची गरजमाझ्या ४० वर्षाच्या अनूभवात सापाने सापाला गिळताने पाहिलेले नाही. परंतू अलिकडे सापाचं सापाचे भक्ष्य करताना अनेक अनुभव पाहावसाय मिळत आहे. हे अन्नसाखळीच्या दृष्टीने धोक्याचे आहे. मानवी वस्ती वन्य प्राण्यांचा वाढता शिरकाव मानव जातीसाठी चिंताजनक गोष्ट आहे. हे गाभीर्याने घेतले पाहिजे. -  सर्पमित्र, दिनकर चौगुले, पोर्ले तर्फ ठाणे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsnakeसाप