कृष्णा सावंत ।आजरा : आजरा नगरपंचायतीच्या पहिल्या उपनगराध्यक्षपदासाठी व दोन स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी गुरूवार (दि.१०) रोजी होत आहेत. उपनगराध्यक्षपदाचे नाव पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बंद पाकिटातून दिले आहे. त्यामुळे या निवडीकडे लक्ष लागले आहे.आजरा नगरपंचायतीचे १९ एप्रिलला राजपत्र तयार झाले आहे. राजपत्र झाल्यानंतर २५ दिवसांच्या आत पहिली सर्वसाधारण सभा बोलावली जाते. यामध्ये उपनगराध्यक्ष व दोन स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाते.दरम्यान, या निवडणुकीत आजरा शहर विकास आघाडीने नगराध्यक्षांसह ९ जागांवर विजय मिळवल्याने हीच आघाडी उपनगराध्यक्षपदासाठी दावेदार राहणार आहे. दोन स्वीकृत नगरसेवकपदासाठी शहर विकास आघाडीबरोबरच विरोधी कॉंगे्रस, राष्ट्रवादी आघाडीकडूनही जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.काँगे्रस, राष्ट्रवादी व शिवसेनेचा एक गट यांच्या सहा जागा निवडून आल्या आहेत. अपक्ष विजयी उमेदवार शकुंतला सलामवाडे यांनी आजरा शहर विकास आघाडीला पाठिंबा दिल्याने या आघाडीचे एकूण १० सदस्य झाले आहेत.काँगे्रस, राष्ट्रवादी आघाडीनेही अभिषेक शिंपी, परेश पोतदार, रशीद पठाण यांच्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे.सत्ताधारी शहर विकास आघाडीकडून स्वीकृत पदासाठी विजयकुमार पाटील, आनंदा कुंभार, नाथ देसाई, प्रा. सुधीर मुंज यांची नावे चर्चेत आहेत. या आघाडीच्या विजयी मेळाव्यानंतर निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जिल्ह्यात उपनगराध्यक्षपदाची व स्वीकृत सदस्यांची एकमेव निवड असल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे या निवडीकडे लक्ष लागले आहे.या निवडीवेळी नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी या पीठासन अधिकारी तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे पुन्हा एकदा आजºयाचे वातावरण तापू लागले आहे.कुणाची वर्णी ?महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बंद पाकिटातून एक नाव आजरा शहर विकास आघाडीकडे दिले आहे. उपनगराध्यक्षपदासाठी नगरसेवक विलास नाईक व आलम नाईकवाडे यांची जोरदार नावे चर्चेत आहेत. यापैकी नाईक हे अनेक वर्षापासून कार्यरत असल्याने त्यांचेच नाव बंद पाकिटात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.स्वीकृत सदस्यांचीनिकषानुसार निवडनगरपंचायतीचा स्वीकृत सदस्य हा पदवीधर अथवा वकील, इंजिनिअर, डॉक्टर असावा तसेच कोणत्याही शिक्षण संस्थेत किमान पाच वर्षे संचालक म्हणून काम केलेला असावा. त्याचबरोबर महानगरपालिका, नगरपरिषदेमध्ये माजी अधिकारी म्हणून निवृत्त असावा, या निकषानुसार निवड करण्यात येत आहे. निकषानुसार विजयकुमार पाटील यांचे नाव अग्रस्थानी आहे.
आजरा नगरपंचायत : उपनगराध्यक्षांचे नाव बंद पाकिटात-निवडीचे अधिकार चंद्रकांत पाटील यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:21 IST
कृष्णा सावंत ।आजरा : आजरा नगरपंचायतीच्या पहिल्या उपनगराध्यक्षपदासाठी व दोन स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी गुरूवार (दि.१०) रोजी होत आहेत. उपनगराध्यक्षपदाचे नाव पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बंद पाकिटातून दिले आहे. त्यामुळे या निवडीकडे लक्ष लागले आहे.आजरा नगरपंचायतीचे १९ एप्रिलला राजपत्र तयार झाले आहे. राजपत्र झाल्यानंतर २५ दिवसांच्या आत पहिली सर्वसाधारण सभा बोलावली ...
आजरा नगरपंचायत : उपनगराध्यक्षांचे नाव बंद पाकिटात-निवडीचे अधिकार चंद्रकांत पाटील यांना
ठळक मुद्दे राजकीय वर्तुळाचे लक्ष