शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेदिक उपचारांनाही लाभणार विमा संरक्षण, एक एप्रिलपासून निर्णयाची अंमलबजावणी

By समीर देशपांडे | Updated: February 7, 2024 11:36 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : सरसकट आयुर्वेदिक उपचारांचाही आता वैद्यकीय विम्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. गेली काही वर्षे यासाठी महाराष्ट्रासह ...

समीर देशपांडेकोल्हापूर : सरसकट आयुर्वेदिक उपचारांचाही आता वैद्यकीय विम्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. गेली काही वर्षे यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक संघटना या मागणीसाठी आग्रही होत्या. त्यानुसार निर्णय घेण्यात आला असून, १ एप्रिल २०२४ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी आयुर्वेदाला पाठबळ देण्यासाठी ‘आयुष’ मंत्रालयाची स्थापना केली होती. गोव्याचे श्रीपाद नाईक यांच्याकडे पहिल्यांदा या पदाचा कार्यभार देण्यात आला होता. गेल्या काही वर्षांत वैद्यकीय विम्याची गरज अधोरेखित झाल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने या पॉलिसी काढत असल्याचे चित्र दिसून येत आहे; परंतु या सर्व पॉलिसींमध्ये सरसकट सर्व रक्कम आयुर्वेद उपचारासाठी वापरता येत नव्हती. जर वर्षाचा वैद्यकीय विमा पाच लाख रुपयांचा असेल, तर त्यातील २० टक्के आयुर्वेद उपचारांसाठी वापरता येत होते. ही सुविधा काही निवडक विमा कंपन्यांनी ठेवली होती.गेल्या काही वर्षांमध्ये आयुर्वेदाचे महत्त्व वाढले असून, अशा पद्धतीची आयुर्वेदिक उपचार केंद्रांना अतिउच्च व उच्च मध्यमवर्गीयांना पसंती मिळत आहे. यामुळे महाराष्ट्रातील मर्म, आयुर्वेदिक व्यासपीठ, निमा यासारख्या संघटनांनी वैद्यकीय विम्यामध्ये आयुर्वेदिक उपचारांचा १०० टक्क्यांसाठी समावेश करावा, अशी मागणी करून ती सातत्याने लावून धरली होती. त्यानुसार ‘आयुष मंत्रालयाने याबाबत निर्णय घेतला असून, भारतीय बीमा नियामक आणि विकास प्राधिकरणाला याबाबत स्पष्ट लेखी सूचना दिल्या आहेत.त्यानुसार प्राधिकरणाने सर्व विमा कंपन्यांना हे बंधनकारक केले आहे. त्यानुसार आयुर्वेदिक उपचार केंद्रांचा वैद्यकीय विमा योजनेतील रुग्णालयांच्या यादीमध्ये समावेश करावा, त्यासाठीचे आवश्यक निकष तयार करावेत, उपचार प्रमाणीकरण करावे, असा आदेश दिला आहे.

गेली काही वर्षे आम्ही आयुर्वेद उपचारांचा वैद्यकीय विमा योजनेत समावेश व्हावा यासाठी आम्ही मागणी करत आलो आहोत. आमची रुग्णालये वैद्यकीय विमा योजनेत बसत नसल्याने अनेक नागरिक उपचाराअभावी परत जात होते. त्यानुसार ‘आयुष’ मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून, त्याचे आम्ही स्वागत करतो. -डॉ. अजित राजिगरे, अध्यक्ष, महाआयुर्वेद रिसर्च ॲण्ड मेडिकल असोसिएशन

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHealthआरोग्य